Koyna Dam
Koyna Damesakal

Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; महाबळेश्वरला 158 मिलिमीटर पावसाची नोंद

२४ तासांत कोयना जलाशयात वाढला तीन टीएमसी पाणीसाठा
Published on
Summary

गेल्या २४ तासांत जलाशयात तीन टीएमसी पाणीसाठा वाढला असून, कोयनानगर येथे १३६ मिलिमीटर, नवजाला २०२ मिलिमीटर व महाबळेश्वरला १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. नवजा परिसरात दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा ६५.४३ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

Koyna Dam
Almatti Dam च्या पाण्यामुळं कोल्हापूरला महापुराचा धोका? कृष्णा समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना साकडं

गेल्या २४ तासांत जलाशयात तीन टीएमसी पाणीसाठा वाढला असून, कोयनानगर येथे १३६ मिलिमीटर, नवजाला २०२ मिलिमीटर व महाबळेश्वरला १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस गेली पाच दिवस कोसळत आहे.

Koyna Dam
Monsoon Latest Update : दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

काल दिवसभर अखंडित पावसाच्या सरी कोसळत होत्या. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सध्या एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, काल रात्री साडेआठ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com