जीवघेणे प्लास्टिक बनतेय बहुपयोगी
जीवघेणे प्लास्टिक बनतेय बहुपयोगी sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर असाही, विविध वस्तूंसाठी पडतंय उपयोगी

बलराज पवार

सांगली: सुमारे चार दशकांपूर्वी सोयीचे वाटणारे प्लास्टिक बॅग, कॅरी बॅग गेल्या दशकभरात मात्र जीवघेणे वाटू लागले आहेत. दैनंदिन जीवनात अविभाज्य बनलेला प्लास्टिक बॅगचा प्रश्न आज गंभीर बनला आहे. या प्लािस्टकचे करायचे काय, असा प्रश्‍न पडला आहे; पण आता हेच प्लास्टिक बहुउपयोगी ठरत आहे. इको ब्रिक्स बनविण्यासह, पेिव्हंग ब्लॉक तसेच विविध वस्तू बनवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

शासकीय पातळीवर प्लास्टिकबाबतचे कायदे आणखी कडक करण्यात येणार आहेत. त्यापेक्षा प्लास्टिक बॅग, कॅरीबॅगच्या वापरावर नियंत्रण आणणे, कचरापेटीत प्लास्टिक न टाकता प्लास्टिकचा पुनर्वापर करणे, या बाबींची अंमलबजावणी व्यक्तिगत पातळीवर आवश्यक आहे. सांगली येथील डॉल्फिन नेचर रिसर्च संस्थेतर्फे दोन वर्षांपासून शाळांमध्ये, तसेच सोसायट्यांमध्ये इको ब्रिक्स बनवण्याचे प्रशिक्षण घेतले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग लाभत आहे. यू-ट्यूब व्हिडिओ बनवून त्यामार्फत ही मार्गदर्शन देण्याचे काम केले आहे.

घरांमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, तेल, द्रवपदार्थ हे प्लास्टिक पॅकिंगमधूनच आणले जातात. या पिशव्या नंतर घराच्या कचराकुंडीत तेथून महापालिकेच्या कचरा गाडीत आणि मग ते प्लास्टिक कचरा डेपोपर्यंत पोहोचते. तिथे ते जाळले जाते, नाही तर जनावरांच्या, प्राणी पक्षी यांच्या पोटात जाण्याची भीती असते. प्लास्टिक जाळले तर विषारी वायूची निर्मिती होते आणि तो श्वसनाच्या विकारापासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगापर्यंत अनेक आजारांना कारणीभूत ठरते.

इको ब्रिक्स म्हणजे काय?

इको ब्रिक्स बनवण्यासाठी कोरड्या प्लास्टिक बॉटलमध्ये प्लास्टिक बॅग, प्लास्टिकचे तुकडे, चॉकलेटचे रॅपर, कॅरीबॅग हवेलाही जागा राहणार नाही अशा पद्धतीने म्हणजेच बाटलीच्या तळापासून भरत आल्यास या बाटलीमध्ये प्लास्टिकचे तुकडे पूर्णपणे भरले जातात. ही बाटली बाहेरून दाबल्यास टणक जाणवते. ही पूर्णपणे भरलेली प्लास्टिक बाटली पूर्ण बंद करणे म्हणजेच इको ब्रिक्स होय.

प्लास्टिक पुनर्चक्रीकरणला जोपर्यंत योग्य गती प्राप्त होत नाही, तोपर्यंत इको ब्रिक्स हा एक चांगला पर्याय म्हणून डॉल्फिन संस्थेने समोर आणला आहे. यामुळे घरच्याघरी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुरू होण्यास मदत होत आहे. नुसता प्लास्टिक गोळा करून आपण प्लास्टिक मुक्त होणार नाही. प्लास्टिकचा वापर कमी करणे. जेवढे वापरले त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यातूनच पर्यावरणाची हानी रोखण्यास मदत होईल.

- शशिकांत ऐनापुरे, संस्थापक डॉल्फिन नेचर रिसर्च संस्था.

प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणाम इको ब्रिक्समुळे कमी होतील आणि याचा वापर वाढलेला असून, वॉल कंपाऊंडसाठी वापर होतो. शिवाय पेिव्हंग ब्लॉकही केले जातात. मिरज रोडवरील कृषी महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या नक्षत्र उद्यानाचे सििव्हल कामासाठी इको ब्रिक्स वापरले जाणार आहे. इको ब्रिक्सचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

- डॉ. मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते इको ब्रिक्सपासून विविध वस्तू.

इको ब्रिक्सपासून विविध वस्तू जसे, स्टूल, खुर्ची, छोटे टेबल, शोभेच्या वस्तू, ट्री गार्ड, वॉल कंपाउंड इत्यादींसाठीही वापर केला जात आहे. महापालिकेने डांबरीकरणामध्ये प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. डॉल्फिन नेचरने एक हजार इको ब्रिक महापालिकेकडे सोपविले. संस्थेचे सदस्य डॉ. मनोज पाटील यांनी क्लिनिकसमोर इको ब्रिक्सची वॉल कंपाऊंड बनवलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT