Sanjay Shinde
Sanjay Shinde 
पश्चिम महाराष्ट्र

LokSabha 2019 : 2014 ला बसविले, 2019 ला उभे केले!

प्रमोद बोडके

सोलापूर : कार्यकर्ता कितीही जवळचा असेना का? जोपर्यंत तो कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार त्याच्या खांद्यावर हात टाकत नाहीत. याचा प्रत्यय पुन्हा आला.

संजय शिंदे 2014 ची लोकसभा निवडणूक माढ्यातून लढण्यास इच्छुक होते, त्यावेळी मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिंदे यांना बसण्यासाठी जागा नव्हती. त्यावर पवारांनी त्यांना विचारले तू आत्ताच का उभा? तेव्हा खुर्ची नसल्याचे शिंदेंनी सांगितले. त्यानंतर पवारांनी त्यांना एक खुर्ची देऊन बसवले. त्याचा परिणाम शिंदेंची तेव्हाची संधी हुकली. त्यानंतर शिंदे यांनी कर्तृत्व सिद्ध केल्याने पवारांनी त्यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे भाजप असो की राष्ट्रवादी दोन्ही दिग्गज पक्ष यंदा शिंदे यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होते. 

खासदारकीपेक्षा आमदारकीची तयारी करणाऱ्या शिंदे यांना शेवटी माढामार्गे राष्ट्रवादीच्या तिकिटावर दिल्लीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. विठ्ठलराव शिंदे, आमदार बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे यांच्यासोबत पवार परिवाराचे भावनिक ऋणानुबंध जोपासत राष्ट्रवादीची निवड केली. सर्व पक्षांत असलेल्या नेत्यांसोबत मैत्रीचे व विश्‍वासाचे संबंध, सुडाचे राजकारण न करता विकासाच्या मुद्यांवर सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका, यामुळे संजय शिंदे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आज स्वकर्तृत्वाने ठसा उमटविला आहे. 

अन्‌ किंगमेकर मामा 
संजय शिंदे यांचा आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, जिल्हा बॅंक अध्यक्ष, आमदारकी व खासदारकीच्या उमेदवारीची संधी हुकली. त्यानंतर ताकदीने ते उभारी घेत असल्याचा अनुभव जिल्ह्याने घेतला आहे. 2002 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित होते.

शिंदे यांना कुणबी मराठा प्रमाणपत्राच्या माध्यमातून अध्यक्षपदाची संधी असताना भोसरे गटातून त्यांचा 80 मतांनी पराभव झाला. 2007 च्या निवडणुकीत त्यांनी 10 हजार मतांधीक्‍यांनी झेडपीत प्रवेश केला. ते उपाध्यक्ष होऊ नयेत यासाठी तत्कालीन ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी प्रयत्न केले. त्यावर मात करत त्यांनी उपाध्यक्षपद मिळविले.

2009 मध्ये अध्यक्षपदाची संधी असताना मोहिते- पाटील समर्थकांमुळे ही संधी हुकली. 2017ला अपक्ष जिल्हा परिषद लढवून त्यांनी बिनविरोध अध्यक्षपद मिळवले. 2010 मध्ये जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची संधी असताना मोहिते- पाटील समर्थकांमुळे त्यांची ही संधी हुकली. 2011 मध्ये त्यांनी डीसीसीचे बिनविरोध अध्यक्ष होऊन ही संधी मिळविली. 2014 मध्ये लोकसभेच्या उमेदवारीची व आमदारकीची संधी हुकल्यानंतर 2019 मध्ये खासदारकीची संधी मिळविली आहे. 

माळशिरस तालुक्‍यात ताकद 
माळशिरस तालुक्‍यात खासदार विजयसिंह मोहिते- पाटील व रणजितसिंह मोहिते- पाटील विरोधकांची मोठी ताकद आहे. ही ताकद विखुरलेल्या स्वरूपात असल्याने मतविभाजनात मोहिते- पाटील यांना संधी मिळते. ही ताकद एकत्रित करण्याचे कसब पक्षाध्यक्ष शरद पवार व अध्यक्ष शिंदे यांच्याकडे असल्याने यंदाच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्‍यातून त्यांना मोठी ताकद मिळण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT