पश्चिम महाराष्ट्र

गुड न्यूज : आता ‘कोविड-19’ चाचण्या सातारा जिल्ह्यातच होणार; प्रयोगशाळेस मान्यता

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : ‘कोविड-19’ची चाचणी करण्यास येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोग शाळेला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कऱ्हाडमध्ये  ‘कोविड-19’च्या चाचण्या होणार आहेत. रूग्णांचे अहवाल लवकर मिळणे शक्य होणार आहे. ‘कोविड-19’ चाचणीची सातारा जिल्ह्यातील एकमेव प्रयोगशाळा ठरली आहे.

कोरोना साथीचा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये संशयित रूग्ण आणि पॉझिटिव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची निर्मिती, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स व अन्य स्टाफ आणि कोरोना बाधित रूग्णांची घेतली जाणारी विशेष काळजी यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रूग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या 4 पेशंटना डिस्चार्ज देण्यात आला असून, यामध्ये 10 महिन्याच्या बालकाचा आणि 78 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात ‘कोविड-19’ची चाचणी करण्याची सोय उपलब्ध नसल्याने संशयित रूग्णांचे स्वॅब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जायचे. त्या प्रयोगशाळेवर मोठा ताण असल्याने किमान दोन दिवसानंतर रिपोर्ट उपलब्ध होत होते. त्यामुळे कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेस ‘कोविड-19’ची चाचणी करण्यास मान्यता मिळावी, यासाठी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले सुरवातीपासून आग्रही होते. ‘कोविड-19’च्या चाचण्या येथेच होऊ लागल्यास लवकर निदान होऊन तातडीने योग्य उपचार सुरू करणे शक्य होईल.  अहवालासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेवर विसंबून राहावे लागणार नाही, ही त्यामागची भूमिका होती.

त्यानुसार कृष्णा हॉस्पिटल प्रशासनाने महिन्याभरापासून नवी दिल्ली येथील भारतीय  वैद्यकीय संशोधन परिषद आणि नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडे पाठपुरावा सुरू केला होता. तसेच हॉस्पिटल प्रशासनाने 9 एप्रिल 2020 रोजी याबाबत पत्रव्यवहारही केला होता. कृष्णा हॉस्पिटलची रोगनिदान प्रयोगशाळा एन.ए.बी.एल. मानांकीत असून, याठिकाणी ‘कोविड-19’ ची चाचणी करण्यास आवश्यक ती सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ स्टाफ असल्याने या प्रयोगशाळेला ‘कोविड-19’ची चाचणी करण्याची परवानगी देत असल्याचे पत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने हॉस्पिटल प्रशासनास पाठविले आहे.

याबाबतची योग्य ती तांत्रिक पूर्तता झाल्यानंतर लवकरच या चाचण्यांना येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेत प्रारंभ केला जाणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

सातारा : औषध हवयं ? घरा बाहेर पडू नका...घरपोच मिळणार

अशीही आठवण : इरफानच्या विनंतीवरुन टाळली पाेलिसी कारवाई

काय सांगता ! दारू दुकानच अनलॉक व्हयं

बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Fifa World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा पराक्रम! लिओनेल मेस्सी, रोनाल्डोला सोडलं मागे; फ्रान्सच्या विजय अन् बाद फेरीत प्रवेश

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण सामंजस्य कराराचे डोवाल यांच्याकडून स्वागत

Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? वीज बिल तिप्पट झाल्याचा ग्राहकांचा गंभीर आरोप, राज्यात संतापाचे वातावरण

SCROLL FOR NEXT