बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?

बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?

कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्यात आज (शुक्रवार) आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी एक महिला कर्मचारी साताऱ्यावरुन ये-जा करत असल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालय आणि कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची सध्या चर्चा सुरु झाली आहे. त्यांना या महामारीच्या संकट काळात आता सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी पीपीई कीट देवुनच रुग्णांची सेवा करण्यास सज्ज ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी आता जिल्हा प्रशासनानेच आवश्यक ती पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

कऱ्हाड तालुक्यात असणाऱ्या कोरोनाने आता उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निमीत्ताने शहरातही प्रवेश केला आहे. येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील एक दोन नव्हे तर तब्बल सहा कर्मचारी कोरोना बाधीत झाल्याचे आरोग्य विभागाकडे आलेल्या अहवालातुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे सारे प्रशासन हादरुन गेले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालुन रुग्णांची सेवा करणारे आरोग्यदुतच बाधीत झाल्याने सर्वांपुढेच आता स्वतःच्या सुरक्षेचा पेच निर्माण झाला आहे.

सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण एकट्या कऱ्हाड तालुक्यात झाले आहेत. सध्या तब्बल 40 रुग्ण कऱ्हाड, मलकापुर-आगाशिवनगर, वनवासमाची, बाबरमाची, रेठरे बुद्रुक, कापीलसह अन्य गावातील आहेत. ही बाबरमाचीतील रुग्णापासुन सुरु झालेली साखळी तुटायलाच तयार नाही. अशातच आठड्यापुर्वी येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी एक महिला दाखल झाली. तीच्या प्रसुती दरम्यान संबंधित महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर संबंधित महिलेचे अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी हादरले होते. त्या महिलेला सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचीही त्यानिमीत्ताने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील एक दोन नव्हे तर तब्बल सहा कर्मचारी कोरोना बाधीत झाल्याचे आरोग्य विभागाकडे आलेल्या अहवालातुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील सारेजणच हादरुन गेले आहे. स्वतःचा जीवावर उदार होवुन रुग्णांची सेवा करणारे आरोग्य दुतच बाधीत झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान एक महिला कर्मचारी साताऱ्यावरुन ये-जा करत असल्याचीही माहिती समोर येत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची सध्या चर्चा सुरु झाली आहे. त्यांना या महामारीच्या संकट काळात आता सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी पीपीई कीट देवुनच रुग्णांची सेवा करण्यास सज्ज ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी आता जिल्हा प्रशासनानेच आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.

बाधीतांचे सहवासित किती ?

रुग्णांना उपचासाराठी सरकारी यंत्रणेमार्फत सुरु असलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रावर भिस्त आहे. त्यांच्यामार्फतच सध्या सरकारी आरोग्य सेवा दिला जात आहे. त्यामुळे येथे तपासणीसाठी येणाऱ्यांचेही प्रमाण जास्त आहे. त्यामुळे संबंधित बाधीत कर्मचाऱ्यांचा किती रुग्णांशी संपर्क आला आहे या भितीने सध्या अनेकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कॉलनी सील

येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपैकी सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सर्वजणच हादरुन गेले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणुन संबंधितांच्या सहवासातील व निकट सहवासातील लोकांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही सध्या सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित कर्मचारी रहात असलेली कॉलनीही सील करण्यात आला आहे.

जिवाची बाजी लावून लढणारेच पॉझिटिव्ह; याला जबाबदार कोण ?

सातारकरांना घरोघरी दूध मिळणार


सातारा : औषध हवयं ? घरा बाहेर पडू नका...घरपोच मिळणार


सातारा शहरात मल्हार पेठेनजीक असलेल्या गार्डन सिटी येथे वास्तव्यास असलेल्या 
एका महिलेस काेराेनाची लागण झाली आहे. ती कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवेस आहे. ती दरराेज कराड ते सातारा आणि सातारा ते कराड असा प्रवास करीत असे.  आज (शुक्रवार) सकाळी तिला थोडा त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात गेल्यावर तिच्यात काेरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे तिला येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान सातारा पालिकेने तिच्या घराचा परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे.

सातारा शहरात दाेन ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्याने शहरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार काळजी घेण्याचे, घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केल जात आहेत. मात्र, जर प्रशासनाच्या त्रुटीमुळे एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह होणार असेल, तर त्याला जबाबदार नेमके कोण असा प्रश्‍नही या निमित्ताने निर्माण होतो आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांबरोबरच सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, त्या वॉर्डमधील कपडे धुणारे कर्मचारी या सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार होणे आवश्‍यक आहे; परंतु तो तेवढ्या गांभीर्याने होत नसल्याची परिस्थिती आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांच्याही तक्रारी आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे कर्मचारी सातारा ते कराड आणि कराड ते सातारा असा प्रवास करीत हाेते हीबाब रुग्णालय प्रशासनाने देखील गांभीर्याने घेऊन संबंधितांना तेथेच निवासाची व्यवस्था करावयास हवी हाेती अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून जिल्ह्यात कार्यरत असणारे कर्मचारी यांच्या सुरक्षिततेबाबतची पावली उचलावीत अन्यथा काेराेनाच्या साखळीच्या वेढ्यात जिल्हा सापडेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com