village
village 
पश्चिम महाराष्ट्र

पाटणला फिटनेस सर्टिफिकेटवालेच आढळले कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा) : रीतसर परवानगी आणि फिटनेस सर्टिफिकेट (वैद्यकीय प्रमाणपत्र) घेऊन मुंबईहून गावी आलेले काही मुंबईकर कोरोनाबाधित आढळल्याने त्यांनी घेतलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. या बाधित रुग्णांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री पाहिली जात असली, तरी ते अगोदरपासूनच बाधित तर नव्हते ना? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य लोक नोकरी व व्यवसायानिमित्ताने मुंबईस वास्तव्याला असतात. त्यामध्ये पाटण तालुक्‍यातील रहिवाशांचे प्रमाण सर्वाधिक आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मुंबईकरांनी थेट गावचा रस्ता धरला. नियमित वाहतूक सुरू नसतानाही नवनवीन युक्‍त्या शोधत चाकरमानी आपापल्या गावी पोचले. पाटण तालुक्‍यातील हा आकडा 70 हजारांच्या घरात पोचला होता. आता पुन्हा उर्वरित मुंबईकरांचे लोंढे गावाकडे धावायला सुरुवात झाली आहे. पाटण तालुक्‍यात नवीन सुमारे दहा हजार मुंबई रिटर्न्सची भर पडली आहे. नव्याने येणारे अनेक मुंबईकर रीतसर परवाना घेऊन येत असले, तरी विनापरवाना येणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. 

काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या पाटण तालुक्‍यात मुंबईकरांच्या आगमनानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढायला लागल्याने गावोगावी भीतीचे वातावरण आहे. डॉक्‍टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन आलेलेही बाधितांच्या यादीत असल्याने त्यांनी घेतलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. मुंबई किंवा अन्य ठिकाणाहून गावी येण्यासाठी प्रवासाचा पास काढताना शासकीय नियमानुसार रीतसर ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यासाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अपलोड केल्याशिवाय पुढील कार्यवाहीच होत नाही. हे प्रमाणपत्र सरकारी व खासगी डॉक्‍टरांकडे अर्ज केल्यानंतर मिळू शकते. ताप, सर्दी, खोकला व अन्य काही कोरोनासदृश लक्षणे आढळून आली नाहीत, तर प्रमाणपत्रधारकाला प्रवासाला परवानगी दिली जाते. प्रवासात संबंधितास बाधा झाल्यास त्याची जबाबदारी प्रवास करणाऱ्यांवरच असल्याचे आणि त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार नसल्याचेही या प्रमाणपत्रावर नमूद आहे. 

प्रवासाची नियमावली, तपासणी कडक करा 
सध्या सापडत असलेल्या अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ट्रॅव्हल्स हिस्ट्री सांगितली जात असली, तरी ते अगोदरपासूनच बाधित तर नव्हते ना..? असा सवालही उपस्थित होत आहे. यंत्रणेने त्याबाबत खोलवर जाऊन तपास केल्यास यातील वास्तव समोर येऊ शकते. सध्या गावांकडे कोरोनाचा फैलाव वाढल्याने मुंबईसह अन्य ठिकाणाहून येणाऱ्यांना प्रवेश थांबवला असला, तरी नव्याने तो सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने सध्याच्या नियमात आवश्‍यक बदल करून कडक तपासणीसाठी पाऊले उचलण्याची मागणी गावागावांतून जोर धरू लागली आहे. 

मुंबईहून गावी आलेले काही ग्रामस्थ लगेच कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट आणि प्रवासपूर्व वैद्यकीय चाचण्यांसह अनुषंगिक नियमावली अधिक कडक व काटेकोर करण्याची गरज आहे. 

- शिवाजीराव पवार, उपसरपंच, बनवडी (ता. पाटण) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT