पश्चिम महाराष्ट्र

लईच भारी ! सातारकरांची त्यांच्या प्रेमास वाट

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः सातारकरांनी काल घरात राहून आपल्या कल्पना शक्तीतून खिडकीतून दिसणारा "गुलमोहर' कागदावर टिपताना गुलमोहराच्या अनेक कौतुकाच्या कविता, गाणी, चारोळ्या ऑनलाइन सादर करत "गुलमोहर डे'ला बहार आणली. कडक उन्हाने इतर झाडे कोमेजून जाताना गुलमोहर मात्र आपल्या लाल- पिवळ्या मनमोहक रंगांच्या फुलांनी फुलत साऱ्यांना आनंद देतो. गेली 20 वर्षे "गुलमोहर डे' साजरा करून या गुलमोहराचे कौतुक साताऱ्यामधील निसर्गप्रेमी करतात.

निसर्गाच्या कुशीत थेट गुलमोहराच्या सान्निध्यात बसून समस्त चित्रकार आपल्या कुंचल्याने गुलमोहराने निरभ्र आकाशात केलेली रंगाची उधळण टिपत आनंद घेतात, तसेच या गुलमोहराच्या झाडाखाली बसून त्याच्या कौतुकाची कवी संमेलने भरवतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या सावटाने लॉकडाउनमुळे सर्वांना घरात बसूनच या रंगाच्या उधळणीचा आनंद घ्यावा लागला. मात्र, अवलिया सातारकर निसर्गप्रेमींनी अशा संचारबंदीतही आपल्या गुलमोहर प्रेमाला वाट करून दिली.
 
सागर गायकवाड व त्यांच्या सहकलाकारांनी अगदी बालचित्रकारांनीही फुललेल्या "गुलमोहरा'ला कागदावर टिपले. मुले आणि तरुण चित्रकार उत्साहाने यात सहभागी झाली होती, तसेच गुलमोहराला पाहून अनेकांच्या काव्य प्रतिभा विलसल्या. एकमेकांना हे सारे शेअर करत "गुलमोहर डे' तितक्‍याच नेहमीच्या उत्साहाने साजरा केला. हे पाहून नक्कीच गुलमोहरही मोहरून गेला असेल, असे मत चित्रकार सागर गायकवाड, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने आणि निसर्ग प्रेमींनी व्यक्त केले. 

सातारा जिल्हा हा रेड झाेनमध्ये गेला आहे. त्यातच शुक्रवारी रात्री उशिरा ५५ रुग्णांवरुन सातारा जिल्ह्यात ६९ इतके रुग्ण झाले. काय झाले नेमके, काेठे आढळले जादा रुग्ण वाचा सविस्तर

...म्हणून त्यांच्यासह सर्वांवर आलेली हीच ती वाईट वेळ; सातारा जिल्हावासियांची भावना

'त्या' महिलेच्या घरातून कोरोनाही बाहेर पडेना 

""आम्ही सातारकर निसर्गप्रेमी दर वर्षी "गुलमोहर डे' गुलमोहराच्या सान्निध्यात जमून साजरा करतो. मात्र, यंदा संचारबंदीने ते शक्‍य होणार नव्हते. समस्त निसर्गप्रेमींना आम्ही हा दिवस ऑनलाइन साजरा करण्याचे आवाहन केलेले होते. त्यास सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गुलमोहराच्या कौतुकाच्या कविता, गाणी, चारोळ्या आणि रेखाटलेली चित्रे व्हॉटसऍप, फेसबुकवर शेअर केली.'' 
- सागर गायकवाड, सातारा, चित्रकार

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT