...म्हणून त्यांच्यासह सर्वांवर आलेली हीच ती वाईट वेळ; सातारा जिल्हावासियांची भावना

...म्हणून त्यांच्यासह सर्वांवर आलेली हीच ती वाईट वेळ; सातारा जिल्हावासियांची भावना

सातारा : सातारा जिल्ह्यात कोराना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. सातारा आणि कराड या दोन प्रमुख शहरांमध्ये आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधितांच्या विळख्यात सापडले आहेत. स्वतःच्या जिवाची बाजी लावून लढणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रारंभापासून दुर्लक्ष होत असल्याचे सकाळने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करुन जिल्हा रुग्णालय व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर काही अंशी बदल झाली. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपुर्ण जिल्ह्यात नागरीकांना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली.

जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन यांनी कोरोनाची साखळी वाढू नये यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना सातारा जिल्ह्यातील नागरीकांनी शंभर टक्के पाठबळ दिले. आजही देत आहेत. परंतु आवश्‍यक त्या उपाययोजना वेळेत केल्या असत्या तर आज आरोग्य कर्मचारी यांच्यावर आलेली वेळ आलीच नसती अशा स्वरुपाच्या प्रतिक्रया जिल्ह्यातील नागरीकांमध्ये आहेत. काही वाचकांनी समाज देखील या गाेष्टीला जबाबदार असल्याचे नमूद केले आले आहे. घरी राहूनच हे युद्ध जिंकायचे आहे असे समाज विसरल्याची खंतही व्यक्त केली आहे. 

अर्थातच घरी बसून बोलायला काय जाते असा प्रश्‍न सर्वांच्या मनात आलाच असेल. परंतु ई - सकाळच्या माध्यमातून नागरीकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही दिलेल्या ई मेल आयडीवर आरोग्य कर्मचारी यांच्या कुटुंबातील लोकांनी देखील खरंच पहिल्यापासून काळजी घेतली असती तर आमच्या भावा बहिणींना आज कोरोनाची बाधा झाली नसती. हिम्मत नहीं हारेंगे...दटकर लढेंगे असा निर्धार व्यक्त केला आहे. 

कोरोना काेरियात क्वारंटाईन खंडाळ्यात 

कोरोना बाधितांच्या निधीसाठी कलाशिक्षकाची अशीही धडपड

कराडचे आनंद गायकवाड म्हणतात एका वाक्‍यात उत्तर द्यायचे तर गांभीर्य नसलेला समाज आहे आपला. आजच्या घडीला आपण बघतोय कि समाजात अनेक लोक असे आहेत की ज्यांना या आजाराचे गांभीर्य नाही. समाजात 3 प्रकारचे लोक आहेत. स्वतःला काही होऊ नये याची काळजी घेणारे, आपल्यामुळे कोणाला काही हाऊ नये म्हणून काळजी घेणारे आणि सर्वात घातक मला काही होत नाही. या तिसऱ्या प्रकारातील अति घातक लोकांमुळे संकट वाढत आहे, अति उत्साह , नको असलेला अति आत्मविश्वास या सगळ्या गोष्टीमुळे संकट वाढताना दिसत आहे.
 
संयमाने राहिलो तर आपण आणि पर्यायाने पोलीस , डॉक्‍टर्स आणि इतर सर्व कोरोना वॉरियर्स यांचा धोका फार कमी होईल.कराड मधील सध्या परिस्थितीमध्ये सर्व हॉस्पिटलमधील स्टाफ किंवा त्याच्याशी निगडित लोक यांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे. बाहेर गावाचे प्रवासी , आजारी असणारे लोक यांची माहिती प्रशासनापासून न लपवता ती सांगणे आणि वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे.
 
सध्याची कराडची परिस्थिती पाहता, सर्वांनीच म्हणजे घरी असणारे, काम निमित्त बाहेर जाणारे, विनाकारण जाणारे , वशिल्यावर फिरणारे आणि सर्व हॉस्पिटल स्टाफ आणि इतर निगडित लोकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करूया , अतिशय काळजी पूर्वक निष्कळजीपणा टाळूया. 
घरीच थांबू. मास्क वापरू. सुरक्षित अंतर ठेऊ. वारंवार साबणाने हात धुवू असा सल्लाही गायकवाड यांनी दिला आहे. 

कोरोना युद्धातील योद्धेच पाॅझिटीव्ह आले तर शासनच त्यांचे मायबाप असते. त्यांच्या कार्याला. आणि शासनाने विशेष लक्ष देवून त्यांना सहिसलामत ठेवावे  इतकी अपेक्षा. 
- भारत भोसले.

आज देवदूतच धारातीर्थी पडतात ह्याला जबाबदार प्रशासन. कर्मचार्यांची योग्य काळजी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. प्रथम सिव्हिल सर्जन यांची बदली झाली पाहिजे कारण तसंच आहे कर्मचारी ओरडून ओरडून घसा कोरडा पडला आहे पण यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चाललेल्या बेजबाबदारपणाचे ऑपरेशन झालेच पाहिजे.
- शिवाजी सोनवलकर
 

आरोग्य कर्मचारी यांनी पीपीई कीट दिले नसते तर हीवेळ आली नसती. सागर शिंदे.शासनाने आरोग्य सेवा,पोलीस प्रशासन, नगरपरीषद कर्मचारी यानां योग्य ते संरक्षणाचे साहीत्य प्राधान्यांने पुरवले पाहीजे. हे कर्मचारी जर कोरोनाग्रस्त झाले तर फार अवघड परीस्थीती निर्माण होईल.
- श्रीपाल जैन,फलटण 

थाळ्या टाळ्या वाजवून नव्हे तर जीवाची बाजी लावून कोरोना लढ्यात सर्वात पुढे असणार्या डॉक्‍टर्स तसेच वैद्यकीय स्टाफ , नर्सिंग स्टाफ , स्वच्छता कर्मचारी यांना देखिल पीपीई किट देऊन कोरोनाविरोधातला लढा जिंकता येऊ शकेल . पण जबाबदार नेते राजकारणात गुंग आणि कार्यकर्ते नेत्यांसाठी थाळ्या टाळ्या वाजवण्यात , दिवे लावण्यात दंग ! या गदारोळात पीपीई किटसाठी अनेकांनी सोशल साईट्‌सवर आवाज उठवला पण आंधळ्या बहिरऱ्या व्यवस्थेला जाग आलीच नाही. जे होऊ नये तेच झाले ,आरोग्य कर्मचारीच कोरोना संक्रमित झाले.आता तरी प्रशासन जागे होणार का ? राजकीय खेळ बंद करुन नेते मंडळी जनतेसाठी लढणाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देणार का ? 
- विवेक कुराडे पाटील.
 
या सर्व गोष्टींना जनता जबाबदार आहे. आपला परिसर सुरक्षित आहे असे समजून जनता बाहेर पडत आहे. आता तरी घरी रहा आणि स्वतःची व समाजाची काळजी घ्या
- अनिकेत बाबर

जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी घरात न बसता स्वतः जातीने लक्ष घालून योग्य ती कारवाई केली पाहिजे. प्रत्येक वार्डातील नगरसेवकांना मार्गदर्शन करून कामगिरी सोपवावी. आमदार, खासदार यांनी स्वतःचे शहर वाचवायचे असल्यास घरी न बसता जिल्हा प्रशासनासोबत मिळून योग्य ती कार्यवाही करावी.
- रोहिणी बोबडे 


जिवाची बाजी लावून लढणारेच पॉझिटिव्ह; याला जबाबदार कोण ?

बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?

कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण जग वेठीला धरले असून भारतामध्ये 35 हजारहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या महाराष्ट्रामध्ये दहा हजार पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. जीवाची बाजी लावून कोरोना विरुद्ध लढणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्‍टर्स, पोलीस दलातील लोक आता कोरोना बाधित होत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खरं तर चीन, अमेरिका, इटली, स्पेन या देशामध्ये कोरोनाने घातलेले थैमान हे डोळ्यासमोर असताना भारत सरकारने दाखवलेली उदासीनता दुर्दैवी आहे. केंद्र शासनाने वेळीच प्राथमिक काळजी म्हणून पीपीई किट्‌स, फेस मास्क, हॅंड ग्लोव्हज, सॅनिटायझर इत्यादी फार्मा उत्पादने मुबलक प्रमाणात उत्पादित केली असती तर किमान आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांना तरी आपला जीव धोक्‍यात घालावा लागला नसता. भारत लॉकडाउन होऊन 40 दिवस उलटले आहेत अद्याप देखील सामान्य नागरिकांना सॅनिटायझर, चांगल्या प्रतीचे मास्क उपलब्ध झाले नाहीत. डेटॉल, स्यावलॉन, लाईफ बॉय यासारख्या भारतातील बड्या कंपन्यांचे साधे साबण या महामारीच्या काळात उपलब्ध होऊ नयेत? यासारखी शोकांतिका दुसरी कोणती नाही. अनेकांनी साठेबाजी केली, दुप्पट किमतीत विक्री झाली यासाठी मार्गदर्शक सूचना करायला देखील केंद्र सरकार विसरले आणि नेमका यानेच सामान्य मानसासह पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा घात केला एवढं मात्र निश्‍चित. 
- विशाल घनवट.  

कोरोनाच्या भीषण आजारच सावट संपूर्ण जगावर आले आहे. कराड तालुक्‍यात आरोग्य विभागाच्या देवदूत समजल्या जाणाऱ्या सेविकेस कोरोनाची लागण झाली आहे अशी चर्चा होत आहे. हा विषाणु अतिभयंकर असल्या कारणाने लागण झालेल्या बाधित व्यक्ती की प्रशासन जबाबदार या खेरीज त्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्याची ती ही वेळ नसून योध्या रूपी निर्बंध आणून वाढत जाणाऱ्या गुणाकारी रुग्णाची संख्या कशी कमी होईल हे अती शहाणपणाचे ठरेल. 
सागर कदम, दौलतनगर करंजे सातारा.

जर काही लोक सगळे काम सोडून घरा मधे बसले असताना पुण्या हून जिल्हा बंदी असून काही लोक सातारा आणी कराड मधे येत आहे म कसली जिल्हा बंदी आणी जिल्ह्याला दोन खाजदार आणी मंत्री पदे आहेत तरी जिल्हा कसा रेड झोन मधे गेला म्हणजे जे लोक घरा मधे बसुन प्रशासनास मदत करत आहेत त्याचे काय? 
सागर लोखंडे.

सरकार मायबाप आमची सुरक्षितता तुमच्या हाती


साेनके, तरडगावला काेराेनाबाधित आढळले; साताराची चिंता वाढली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com