दुसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ
दुसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ 
पश्चिम महाराष्ट्र

दुसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ

संतोष चव्हाण

उंब्रज (ता. कऱ्हाड, जि. सातारा): येथे सुरु असलेले दुसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने मोठया उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी परिसरातील शाळेच्या विदयार्थी-विदयार्थीनी हजारोच्या सहभागी झालेने गावातून काढलेली फेरी ही अभूतपूर्व झाली. येथील महात्मा गांधी विद्यालय प्रांगणात संमेलन भरले आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थीतीत ग्रंथदिंडीचे पूजन झाले. त्यानंतर ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला.

ग्रंथदिडींत गांधी विदयालय, महिला महाविद्यालय, कन्या शाळा, यशवंतराव जाधव विद्यालय, होली कॉनव्हेनट स्कूल, ग्लोबल इंग्लीश मेडियम स्कूल, आदर्श शाळा, जिल्हा परिषद शाळा सहभागी झाल्या होत्या. लेझिम पथक, वारकरी संप्रदाय टाळ मृदुंगाचा गजर करीत हरी नामाचा गजर सुरू होता त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. त्यापाठोपाठ पारंपारिक वेषभूषेतील विदयार्थी होते. महिला महाविद्यालयाच्या युवती घोडे स्वार होऊन राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, अशा वेगवेगळया वेषभूषा करून घोडयावर स्वार झाल्या होत्या. यामध्ये वेगवेगळया साहित्याविषयी माहिती करून देणारे फलक, तसेच स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, वृक्ष संवर्धनाचे संदेश, लेक वाचवा या संदेशाचे फलक, झळकत होते. फेरी सुरभी चौकातून सरळ माणिक चौक मार्गे शिवाजी महाराज पुतळया नजीक आली. त्यावेळी शिवाजी महाराज पुतळयासमोर युवतींनी लेझिम पथक सादर केले. त्यानंतर भव्य दिव्य साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेला मंडप हा विदयार्थी विदयार्थीनी भरगच्च भरून गेला. यावेळी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमास सुरवात झाली. यामध्ये प्रास्ताविक संजय पाटील यांनी करत कार्यक्रमास सुरवात केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकला जाधव या होत्या. यावेळी सुरवातीलाच सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान करून सुनिता जाधवने उस्फूर्त दाद मिळवली. यावेळी आभार सुरेश साळुंखे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT