पश्चिम महाराष्ट्र

शाल्मलीने थिरकवले...(व्हिडिआे)

सकाळवृत्तसेवा

सांगली - ‘मैं परेशाँ..परेशाँ’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या शाल्मली खोलगडेने आज वसंतदादा महोत्सवात याच गाण्याने सुरवात करत रंग भरला. खास शैलीत एकापेक्षा एक गीते सादर  करताना नृत्याची जोड देत तरुणाईला डोलायला लावले. ‘रिमिक्‍स’च्या जमान्यात तरुण-तरुणींच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या शाल्मलीच्या नॉनस्टॉप गाणी, नृत्यांवर सांगलीकरांनी जल्लोष केला.

वसंतदादा महोत्सव समितीच्या वतीने युवा नेते विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने डॉ. आंबेडकर स्टेडियमवर ‘वसंतदादा महोत्सवा’स प्रारंभ झाला. भव्य स्टेज, डोळे दीपवणारी विद्युत व्यवस्था, नेटकी बैठक व्यवस्था अशा शिस्तबद्ध वातावरणाने महोत्सवात रंग भरला गेला. श्रीमती शैलजा पाटील, विश्‍वासबापू पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, ऐश्‍वर्या पाटील, जिल्हा बॅंक संचालक प्रताप पाटील, सी. बी. पाटील, बाळासाहेब होनमोरे, विशाल चौगुले, अण्णासाहेब कोरे, वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, पी. एल. राजपूत, उदय पवार, नगरसेवक मनोज सरगर, उमेश पाटील, आदिनाथ मगदूम, सुनील आवटी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. काहीशा विलंबाने सांगलीकर रसिक परेशान झाले असतानाच ‘मैं परेशाँ..परेशाँ’ हे इश्‍कजादे चित्रपटातील गीत सादर करत शाल्मलीने सुरवात केली. खास  शैलीतील गीत सादर करतानाच तिने दिलखेचक नृत्यही सादर केले. त्यामुळे पहिल्याच गाण्यावर प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर ‘उर्वशी..उर्वशी टेक ईट इझी उर्वशी’, ‘हम्मा..हम्मा एक हो गये हम और तुम’ गाणे सादर केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांचा पाऊस पडला.

एंट्रीलाच प्रतिसाद पाहून शाल्मलीने खास मराठीत ‘मी पहिल्यांदाच आले तुमच्या सांगलीत. तुम्हाला पाहून आपली सांगली म्हणावी वाटते’ असे म्हणत स्टेजवरून उतरत थेट तरुणींच्या घोळक्‍यात प्रवेश केला. ‘कोई जादू होने को है’ गाणे म्हणत सर्वांची मने जिंकली. मराठीतील रिमिक्‍स ‘फ्रेश’ गाणे म्हणले. ‘इतना सोना क्‍यूँ रबने बनाया’, ‘चंदा रे चंदा’, ‘रूबरू रोशनी’ अशी नॉनस्टॉप गाणी म्हणत तिने प्रेक्षकांत जल्लोष निर्माण केला. प्रेक्षकांतील मध्यमवयीन महिलांसाठी ‘आन्टीजी’ गाणे सादर करून त्यांनाही जिंकले. ‘बत्तमीज दिल’ गाण्यांवर तर दूरवरच्या प्रेक्षकांनाही डोलायला लावले. ‘ए कुडी मेनू कहदी की जूती ला दे सोनिए’ गाण्यालाही प्रतिसाद मिळाला. सलग एकापेक्षा एक गाणी आणि नृत्य सादर करत शाल्मलीसह टीमने जल्लोषात महोत्सवाची सुरवात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT