पश्चिम महाराष्ट्र

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले मी स्वत: आग्रही आहे परंतु...

सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर (जि.सातारा) : कोयना धरणात बोटींग सुरु करणेसंदर्भात मागील आठवडयात ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर धरणात बोटिंग स्पॉट निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या दोघांनी बोटिंग स्पॉटची प्रत्यक्ष पाहणी करून तो फाइनल करावा. त्याचा तात्काळ अहवाल गृह मंत्रालयाकडे सादर करावा असे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत..

मंत्री देसाई म्हणाले याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे बैठक झाली होती. या बैठकीमध्ये धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये कोयना धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घेणेकरीता गृह विभागाचा सविस्तर अहवाल प्राप्त होणे गरजेचे असून यासंदर्भात गृहविभागाची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी व सातारा पोलीस अधीक्षक या दोघांनी बोटींग सुरु करण्याच्या जागांची संयुक्त पहाणी करुन याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा जेणेकरुन यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांचेकडे अधिवेशन काळात बैठक घेवून निर्णय घेणे शक्य हाेणार असल्याने आज (साेमवार) सातारा येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस.एल.डोईफोडे, कार्यकारी अभियंता कुमार पाटील, वन्यजीवचे विभागाचे प्रभारी उपसंचालक महादेव मोहिते, वन्यजीव कोयना विभागाचे सहाय्यक वनसरंक्षक सुरेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. 
                 
कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस. एल.डोईफोडे यांनी कोयना धरणाच्या जलाशयातील बोटींग करण्याच्या जलक्षेत्र उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची माहिती दिली. यामध्ये धरणाच्या भिंतीपासून सुमारे पाच किलाे मीटर अंतरावर बोटींग करणेकरीता मान्यता दयावी याकरीता मी स्वत: तत्कालीन गृहमंत्री केसरकर व तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हवाई तसेच प्रत्यक्ष जागांची पहाणी केली होती. तसेच यासंदर्भात तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्याकडे बैठकाही झाल्या होत्या. कोयना धरणामध्ये बोटींग सुरु व्हावे याकरीता मी स्वत: आग्रही आहे.परंतू धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बोटींग करण्याकरीताची जागा निश्चित करणे आवश्यक आहे.

मुंबई : काेयनेतील बाेटींगसाठी कट्टर विराेधक एकत्र

Video : खास तिच्यासाठी गृह राज्यमंत्री थेट शाळेच्या दारात

कोयना धरणामध्ये सुरक्षिततेच्या दृटीने कोणत्या ठिकाणी बोटींग सुरु करण्याकरीता वाव आहे हे पहाण्याकरीता जिल्हा प्रशासनाने आणि पाेलीस विभागाने जागांची संयुक्त पहाणी करावी. त्याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करणे आवश्यक असल्याने त्याची तातडीने कार्यवाही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडिआे पहा 

45 वर्षानंतर साताऱ्याला संधी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Verdict : काँग्रेसला धक्का! मीनाक्षी नटराजन यांना 'सर्वोच्च' दणका; राज्यसभा उमेदवारी अर्ज फेटाळण्याविरोधातील याचिका केली नामंजूर

Mumbai News: धारावी पुनर्विकासाला वेग! रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटिसा; स्थलांतर प्रक्रियेला सुरुवात

Latest Marathi News Live Update : माजलगावात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद

Latur Farmer: मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश! ‘शेतकऱ्याला आवडेल तो बैल द्या’; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, आजारी बैल प्रकरणाची घेतली दखल..

Malegaon Child Death : मालेगावात मशि‍दीसमोर खेळताना 5 वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू; नागरिकांचा तीव्र संताप, मध्यरात्रीपर्यंत आंदोलन

SCROLL FOR NEXT