शेतकऱ्यांनी काम बंद पाडले
शेतकऱ्यांनी काम बंद पाडले sakal
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा : जोपर्यंत जमिनीचे दाम नाही,तोपर्यंत काम करू देणार नाही

सकाळ वृत्तसेवा

शिराळा: चिखली ता. शिराळा येथे नाटोली मळा बाजूने शेतकर्यांनी कालव्याचे काम तिसऱ्यांदा बंद पडून जोपर्यंत जमिनीचे दाम नाही,तोपर्यंत काम नाही असा इशारा पाटबंधारे विभागास दिला आहे. चिखली गावातून वारणा डावा कालवा जातो. पाटबंधारे विभागाने येथील जमिनीचे भूसंपादन न,कालव्याची कामे काही ठिकाणी सुरु केली होती. मात्र चिखली येथील शेतकर्यांना ३३ वर्षे त्या जमिनींचा मोबदला दिलेला नाही. जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई न मिळाल्याने तहसीदार कार्यालय येथे १ फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. यावेळी १७ फेब्रुवारीला प्रांताधिकारी यांची बैठक आयोजित करून तोडगा काढू असे लेखी आश्वासन दिल्या नंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते.

१७ फेब्रुवारीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागणीवरती प्रशासनाने समाधानकारक उत्तर नाही दिले नाही. याउलट कालव्याचे काम सुरू करण्या बाबत आग्रह करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी जो पर्यंत मोबदला व नुकसान भरपाई मिळत नाही ,तोपर्यंत काम सुरू करू नये अशी भूमिका घेतली होती.

आज पुन्हा एकदा काम सुरू करण्याचा ठेकेदार यांच्या मार्फत नाटोली मळा च्या शेजारी चिखली हद्दीत प्रयत्न झाला. त्यावेळी संतप्त कालवा बाधित शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. यापूर्वी गायकवाड मळा व कांदे फाटा येथे प्रयत्न केले असता शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. संबंधीत ठेकेदार व पाटबंधारे विभागाचे अधिकारी ,कर्मचारी घटनास्थळी आले असता सर्व शेतकऱ्यांनी जोपर्यंत जमिनीचा मोबदला व जमीन नुकसान भाडेपट्टा मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये अशी भूमिका घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT