garden
garden 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात साकारतंय 4.34 कोटींचे स्मार्ट उद्यान

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापालिकेच्या उद्यान कार्यालय परिसरात स्मार्ट उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 4.34 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, 11 प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात झाली आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. निखिल कन्स्ट्रक्‍शन ही कंपनी हा परिसर विकसित करणार आहे. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 

या ठिकाणी महापालिकेची नर्सरी करण्यात येणार आहे. याशिवाय, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे मॉडेल तयार करण्यात येणार आहे. तसेच थीम पार्क, लॅंडस्केप विकसित करणे, साहसी खेळ, पदपथ, रेस्टॉरंट, मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करण्यात आली आहे. याशिवाय उद्यानात आकर्षक पद्धतीचे दिवे लावण्यात येणार आहेत. ऍम्फी थिएटर, गार्डन बेंच आणि स्वच्छतागृहाचीही सुविधा या ठिकाणी केली जाणार आहे. 

चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन 
शहरात जमा झालेला कचरा संकलित करण्यासाटी चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन हुक लोडर आणि आठ मोबाईल कॉम्पॅक्‍टर खरेदी केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT