Manoj Patil
Manoj Patil 
पश्चिम महाराष्ट्र

संघटित गुन्हेगारीला मोडून काढणार: पोलिस अधीक्षक पाटील 

परशुराम कोकणे

सोलापूर : संघटित गुन्हेगारी हा एक मोठा विषय आहे. मी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न चालविले आहेत. सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांची "टू प्लस'ची यादी तयार करण्यात येत असून येत्या काही महिन्यांत याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महिलांच्या सुरक्षेलाही आम्ही प्राधान्य दिले आहे. स्मार्ट पोलिसिंग करताना सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य असेल. बदनामी झाली तरी चालेल पण कोणावर अन्याय होऊ देणार नाही, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात सांगितले. 

"सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे स्वागत केले. "मी 2006 ते 2008 या कालावधीत सोलापुरात अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होतो. सोलापूरची जिल्ह्याची भौगोलिक माहिती आधीपासूनच आहे. आजवरच्या कामामुळे सोलापूरसारख्या आव्हानात्मक जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण पोलिस दलात काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जिल्ह्यात अवैध व्यवसायांचा प्रश्‍न गंभीर आहे. समस्येच्या मुळापर्यंत जाऊन मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलिसांसह विशेष पथकही कार्यरत आहे. घटनास्थळावर सापडणाऱ्या पंटरच्या मागे खरे आरोपी कोण आहेत याचा शोध आम्ही घेत आहोत. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय चालू आहेत तेथील प्रभारी अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला जात आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. येत्या तीन-चार महिन्यांत सकारात्मक बदल दिसून येतील. महिलांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असेल. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिक आणि पोलिस यांच्यात समन्वय महत्त्वाचा आहे, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. अवैध व्यावसायासह इतरही काही माहिती असल्यास 0217-2732000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

मी मूळचा कौलगे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील आहे. सांगलीत माझे शिक्षण झाले. दोन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 1998 मध्ये पोलिस सेवेत आलो. आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आनंदी परिवार आहे. मला वेगवेगळ्या प्रकारचे चवीस्ट खाद्य खायला आवडते. त्यातही मासे हा माझा आवडता खाद्यपदार्थ आहे. वेळ मिळेल तेव्हा आवडीने चित्रपटही पाहतो, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. 

वाळू तस्करी ही जिल्ह्यातील मोठी समस्या आहे. दारू, मटका, वाळू या अवैध व्यवसायासोबतच शरीराविषयी, मालाविषयी गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची टू प्लसची यादी करण्यात येत आहे. यादी पूर्ण झाल्यानंतर कारवाईला सुरवात होईल. पोलिसांची बदनामी झाली तरी चालेल पण कोणावर अन्याय होऊ देणार नाही. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT