for Solapur University new Register will come from Nagpur
for Solapur University new Register will come from Nagpur 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठासाठी नागपूरवरून येणार नवे कुलसचिव !

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्‍ती झाल्यानंतर कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. आता नव्या कुलसचिवांचा शोध नागपूरवरून सुरू असून त्यासाठी कुलगुरू पुढाकार घेत असल्याची चर्चा आहे.

मागील काही दिवसांपासून विद्यापीठातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागपूर विद्यापीठातील काही तज्ज्ञ डॉक्‍टर, प्राध्यापकांसह अन्य महत्त्वाच्या व्यक्‍तींचा संपर्क सोलापूर विद्यापीठात वाढला आहे.

कुलसचिवांची निवड संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली दोन अन्य विद्यापीठाचे कुलगुरू, मॅनेजमेंट कौन्सिल व मागासवर्गीय असे प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक अथवा प्रतिनिधी यांच्या समितीतर्फे होते. परंतु, यामध्ये कुलगुरूंची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आगामी काळात नागपूरवरून नवे कुलसचिव आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. 

कुलसचिव बदलाची कारणे गुलदस्त्यात 
विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियुक्‍ती पाच वर्षांसाठी असते. एक वर्षाच्या कालावधीनंतर संबंधित कुलगुरूंनी मुदतवाढ देणे अपेक्षित असते. कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांचा एक वर्षाचा कालावधी 9 ऑक्‍टोबरला संपण्यापूर्वीच डॉ. मंझा यांना बोलावून कार्यकाल संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता आपल्याला मुदतवाढ मिळणार नसल्याची खात्री झाल्याने डॉ. मंझा यांनी राजीनामा दिला. मात्र, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कोणतेही कारण न सांगताच त्यांना मुदत संपल्याचे सांगितले. डॉ. मंझा यांनी एक वर्षाच्या कालावधीत विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. विद्यापीठाच्या नावलौकिकासाठीही काम केले. असे असतानाही त्यांना मुदतवाढ का दिली नाही, नागपूरवरून कुलसचिव आणण्याचे नियोजन आहे का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT