Solapur Crime.
Solapur Crime. sakal
सोलापूर

शेतीच्या कारणातून सशस्त्र हल्ला, पाच जणांना १० वर्षे सक्तमजुरी! तपासात त्रुटी, सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीचे पोलिस अधीक्षकांना न्यायालयाचे आदेश

तात्या लांडगे

सोलापूर : आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील सुरेश सासवे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर शेतीच्या कारणातून जीवे मारण्याच्या उद्देशाने सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी संजय क्षेत्री याच्यासह पाच आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी दहा वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. फिर्यादी व जखमींना प्रत्येकी दहा हजारांच्या भरपाईचेही आदेश त्यांनी दिले.

खटल्यातील आरोपी व फिर्यादी सुरेश धर्मण्णा सासवे यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जमीन वहिवाटीवरून वाद सुरू होता. फिर्यादी सुरेश हे जबरदस्तीने शेत कसत असल्यावरून आरोपी चिडून होते. घटनेदिवशी २३ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी फिर्यादी सुरेश हे आपली पत्नी, मुलगा, सून व नातू यांच्यासह घरासमोर बसले होते. त्यावेळी आरोपी रतनबाई सासवे व जगूबाई सासवे या दोघी फिर्यादीच्या घरासमोर आल्या. त्यांनी शिवीगाळ सुरू केली व पाठोपाठ संजय क्षेत्री, अभिमन्यू सासवे, शामराव सासवे हे त्याठिकाणी तलवार, काठ्यांसह आले. त्यांनी सुरेश सासवे यांच्या कुटुंबावर हल्ला केला. फिर्यादी सुरेश यांच्या डोक्यात तलवारीने वार केला व पत्नी भांडण सोडवायला आल्यावर तिच्यावरही तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.

आरोपी रतनबाई व जगुबाई यांनी तुम्हाला ठार मारतो म्हणून डोळ्यात चटणी टाकून मारहाण केली. या सशस्त्र हल्ल्यात फिर्यादी सुरेश, त्यांची पत्नी इंदूबाई, गुंडुराज, उज्वला व प्रियांका यांना गंभीर दुखापती झाल्या. त्यांनी सर्वांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद सुरेश सासवे यांनी वळसंग पोलिसांत दिली. पोलिसांनी तपास करून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या न्यायालयात झाली. यात सरकारतर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्यात फिर्यादी, सर्व जखमी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यात सरकारतर्फे ॲड. दत्तुसिंग पवार, ॲड. शैलजा क्यातम, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. जयदीप माने व सर्व आरोपींतर्फे ॲड. राजकुमार म्हात्रे यांनी काम पाहिले.

तपास अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश

या गुन्ह्यातील तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांच्यावर न्यायाधीशांनी ताशेरे ओढले. त्यांनी जखमींचे वैद्यकीय प्रमाणपत्रे न्यायालयात सादर केली नाहीत. सर्व जखमींचे जबाब नोंदविले नाहीत. गंभीर गुन्ह्याच्या तपासात त्रुटी ठेवल्याबद्दल तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक श्री. सोनकांबळे यांची चौकशी पोलिस अधीक्षकांनी करावी, असेही आदेश न्यायालयाने दिल्याचे सरकारी वकील दत्तूसिंग पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT