bharad bhakri pandit jawaharlal nehru maharashtra 1952 drought shortage of water food
bharad bhakri pandit jawaharlal nehru maharashtra 1952 drought shortage of water food Sakal
सोलापूर

Solapur News : भरडाची भाकरी पाहून पंडित नेहरू गहिवरले

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : महाराष्ट्रात १९५२ साली पडलेला दुष्काळ भीषण स्वरूपाचा होता. पिण्याच्या पाण्यासाठी, भाकरीसाठी वणवण भटकावे लागे. हजारो जनावरे त्या काळात मरण पावली. त्यांच्या पुरचुंडीतील माळरानावर येणाऱ्या गवताच्या बियांची केलेली भाकरी पाहून पंडित नेहरू गहिवरले.

तसेच पुढे त्यांनी करमाळा येथील जाहीर सभेत स्वस्त धान्य त्वरित उपलब्ध करण्याचे जाहीर करत, त्याची आजपासून अंमलबजावणी करा, असे व्यासपीठावरच कलेक्टरांना आदेश दिले. सांगलीचा जत-आटपाडी भाग, सोलापूरचा सांगोला, करमाळा, माढा या तालुक्याचा भाग, नगरचा करमाळा तालुक्याला लागून असलेला भाग यात या दुष्काळाचे स्वरूप भीषण होते.

ठिकठिकाणी रस्त्यावर मेलेल्या जनावरांचे सांगाडे दिसत. जगण्यासाठी लोक घरे सोडून गेल्याने अनेक खेडी निर्मनुष्य झाली होती, या भागात भूकबळी पडल्याच्या वार्ता प्रसिद्ध झाल्या, ज्या अधिकाऱ्यांनी नाकारल्या.

महाराष्ट्रातील या भयानक दुष्काळाच्या परिस्थितीने पंडित नेहरूही व्यथित झाले होते. त्याचवेळी गुजरातमध्येही दुष्काळ पडला होता. त्यामुळे गुजरात व महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा त्यांनी पाहणी दौरा मोटारीने केला.

दुष्काळी कामावरील स्त्रियांनी झाडाला टांगलेली बालके पाहत असता त्यांच्या नेत्रातून आटपाडी येथे अश्रूही ओघळले. नेहरू गुजरातचा दौरा संपवून महाराष्ट्रात निघाले होते. पंडितजी ठिकठिकाणी थांबत, त्यांच्या अडचणी समजून घेत. सोलापूरला पंडितजींचे आगमन झाले. डाक बंगला तितका सुसज्ज नसल्याने त्यांचा मुक्काम कलेक्टर झुबेरींच्या बंगल्यात होता.

भरडाची भाकरी आणि ‘व्हॉट इट मीन’

करमाळ्याकडे जाताना पंडितजी गाडीतून उतरले. रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली १००-१५० कामगार आपल्या कापडाच्या पुरचुंड्या सोडून जेवण करीत बसलेले त्यांनी पाहिले होते आणि त्या दिशेने ते गेले.

पंडितजींनी त्यांच्या परचुंड्यातील एक भाकरी घेतली. 'हे काय आहे?' ती गव्हाची पोळी दिसत नव्हती म्हणून त्यांनी विचारले. कामगारांनी सांगितले की भरडाची भाकरी आहे. 'व्हॉट इट मीन?' पंडितजींनी कलेक्टर झुबेरी यांना विचारले. त्यांनी इंग्रजीत सविस्तरपणे सांगितले. दुष्काळातही माळरानावर एक प्रकारचे गवत येते. त्याला ज्या बिया येतात त्याला बरड म्हणतात. ते दळून त्याची ही भाकरी केलेली आहे झुबेरींने खुलासा केला.

सोलापूर जिल्ह्यात १९५२ आणि १९७२ साली दुष्काळ पडला होता. आम्हीही लाल ज्वारीची भाकरी खाल्ली आहे. स्वस्त धान्य योजना तेव्हाच उदयास आली. सध्याचे रेशन दुकान हा त्याचेच एक रुप आहे.

- शिवलिंगप्पा शहाबादे, ज्येष्ठ नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT