1corona_20test_48.jpg
1corona_20test_48.jpg 
सोलापूर

कोरोना पॉझिटिव्ह अन्‌ मृत्यूमध्ये पुरुषच आघाडीवर ! आज सापडले 35 रुग्ण; दोघांचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील 90 हजार 763 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यात नऊ हजार 460 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज 501 संशयितांमध्ये 35 व्यक्‍ती पॉझिटिव्ह आढळल्या असून त्यातील जुळे सोलापुरातील वामन नगरात राहणाऱ्या 73 वर्षीय महिलेचा आणि होटगी रोडवरील मंत्री चंडक येथील 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील पाच हजार 579 पुरुषांना कोरोनाची बाधा 
  • चार हजार 951 पुरुषांनी केली कोरोनावर मात; मृतांमध्ये 352 पुरुष 
  • शहरातील तीन हजार 881 महिलांना कोरोना; तीन हजार 537 महिलांची कोरोनावर मात 
  • आतापर्यंत 176 महिला ठरल्या कोरोनाच्या बळी; सध्या 168 महिलांवर उपचार सुरु 
  • शहरातील 276 पुरुषांवर सुरु आहेत उपचार; आज 22 पुरुष तर 13 महिला कोरोना पॉझिटिव्ह 

शहरात आज मजरेवाडी, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, हुडको कॉलनी (कुमठा नाका), मिलिंद नगर (बुधवार पेठ), वसंत विहार (गुलमोहर सोसायटी), आदित्य नगर, एसआरपी कॅम्प, गजानन अपार्टमेंट (आसरा सोसायटी), चाटला चौक, भवानी पेठ, गुरुवार पेठ, जोडभावी पेठ, कोणार्क नगर, आनंद नगर, प्रेम नगर, आनंद नगर (जुळे सोलापूर), सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. सहा, महालक्ष्मी चौक (विडी घरकूल), मोहीते नगर (होटगी रोड), कृष्णा वसाहत, अवंती नगर, सिध्देश्‍वर नगर (मजरेवाडी), शाहीर वस्ती (भवानी पेठ), गीता नगर, तोडकर वस्ती (बाळे) आणि मल्लिकार्जून नगर (सैफूल) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. होम क्‍वारंटाईनमध्ये 101 संशयित असून इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन आणि होम आयसोलेशनमध्ये अवघे 67 संशयित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT