वारकऱ्यांवर आली "येथेच माझे पंढरपूर' म्हणण्याची वेळ ! Canva
सोलापूर

वारकऱ्यांवर आली "येथेच माझे पंढरपूर' म्हणण्याची वेळ !

वारकऱ्यांवर आली "येथेच माझे पंढरपूर' म्हणण्याची वेळ !

दस्तगीर मुजावर

सलग दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंढरपूरला आषाढी वारीकरिता जाता येत नसल्यामुळे दिंड्यांतील भक्त जड अंत:करणाने "येथेच माझे पंढरपूर' असे म्हणत आहेत.

पांडे (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर दिंड्यांना परवानगी न मिळाल्याने पंढरपूर आषाढी वारी जवळ येऊ लागली तसतसे दरवर्षी गावोगावी येणाऱ्या दिंड्यांचे हलकारे ऐवजी आता दिंडीचे चालक व वारकरी महाराज गावोगावी जाऊन अन्नदात्यांची भेट घेऊन, याही वर्षी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून दिंड्या पंढरपूरला (Pandharpur) सलग दुसऱ्या वर्षीही जाणार नसल्याचे सांगत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाता येत नसल्याने "येथेच माझे पंढरपूर' असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे, अशी खंत महाराज व वारकरी व्यक्त करीत आहेत. (Devotees are emotional as they cannot go to Pandharpur for Ashadi Wari-ssd73)

करमाळा तालुक्‍यामधून (Karmala Taluka) शंभरपेक्षा जास्त दिंड्या पंढरपूरला जात असतात. नगर, बीड, औरंगाबाद, पैठण, नेवासा, दौलताबाद आदी गावांतून करमाळा तालुक्‍यातील गावांमध्ये चहा- अल्पोपाहार घेतात. मुकाम ठिकाणी लोक वारकऱ्यांना अन्नदान करतात. गावातील तसेच शहरातील लोक या दिंड्यांमध्ये सामील होतात. पंढरपूरला वर्षातून एकदा पायी वारी करणारे लोक वारकरी व महाराजांच्या भेटी घेत आहेत. सलग दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंढरपूरला आषाढी वारीकरिता जाता येत नसल्यामुळे दिंड्यांतील भक्त जड अंत:करणाने "येथेच माझे पंढरपूर' असे म्हणत आहेत.

वयाच्या तीस वर्षांपासून आषाढी वारीत पंढरपूरला वारकरी म्हणून जात आहे. आता माझे वय साठ वर्षे आहे. दोन वर्षे झाली करोनामुळे वारी हुकल्याने दु:ख होत आहे.

- सुनील मुजावर

पंढरपूरला आषाढी वारी काळात दिंड्या व वारकरी हरी नामाच्या गजराने दुमदुमत जात असतात. गावात दिंड्यांचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले जाते. मात्र आता दिंड्या गावात येणार नसल्यामुळे सुनेसुने वाटत आहे.

- नवनाथ दुधे महाराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT