MLA Samadhan Autade
MLA Samadhan Autade Sakal
सोलापूर

Mhaisal Water : 'म्हैसाळ'च्या पाण्याचे योग्य वाटप करा; आमदार आवताडेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

महेश पाटील

सलगर बुद्रुक - पिढ्यान पिढ्यांच्या संघर्षातून 'म्हैसाळ'चे पाणी मंगळवेढ्यातील 19 गावांमध्ये आले आहे. पण या आलेल्या पाण्याचे टेल टू हेड या पध्द्तीने योग्य वाटप करा व माझ्या मतदारसंघातील लाभपट्यातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचवा, अश्या सूचना आमदार आवताडे यांनी म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना केल्या.

दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांमधील 6 हजार हेक्तर क्षेत्रावर या पाण्याचा लाभ मिळणार आहे. पण पाण्याच्या वाटपात दुजाभाव होत आहे. अधिकारी पाणी वाटपात पक्षपणा करत असल्याचे नागरिकांचे मत होते. त्यामुळे आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या व यापुढे शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी आल्यास त्याला अधीकारीवर्गांना जबाबदार धरले जाईल.

त्यानंतर आमदार आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, म्हैसाळ योजनेतून सलगर बुद्रुक सह कांही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी ही वेगळ्या पध्द्तीने नियोजन करू व त्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काढून पाहिजेत तेवढा निधी आणण्यात येईल.

पाणी प्रशनाच्या या बैठकीसाठी 19 गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळेस शेतकऱ्यांकढुन आमदार आवताडेंना पाणी प्रशनाच्या संदर्भातील निवेदने देण्यात आली.

दरम्यान यावेळी भैरवनाथ शुगरचे उपाद्यक्ष अनिल सावंत, शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत सर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र जाधव, दामाजी शुगरचे माजी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, पोलीस निरीक्षक रणजित माने तसेच सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपकार्यकारी स्वप्नील गोसावी, अजिंक्य जाधव, शाखा अभियंता महेश पाटील, मंगेश शिंदे यांच्याबरोबरच म्हैसाळ लाभपट्यातील 19 गावातील सरपंच, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान लवंगीचे माजी उपसरपंच तानाजी पवार, आसबेवाडीचे हणमंत आसबे, शिवनगीचे सदाशिव केंगार, सलगर बुद्रुकचे तानाजी जाधव, सलगर खुर्दचे रावसाहेब कांबळे, येळगीचे सचिन सावंत, सोड्डीचे शांतप्पा बिराजदार, शिरणांदगीचे किसन पाटील, पडोळकर वाडीचे रावसो पडोळकर, जंगलगीचे राजु बिराजदार, बावची गावचे महावीर बंडगर इत्यादी गावातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT