solapur
solapur sakal
सोलापूर

Solapur : नवा व्हेरिएंट; अक्कलकोट अलर्ट मोडवर

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : कोरोनाच्या जे-एन १ या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने अक्कलकोट येथील स्वामी समर्त देवस्थानमधील यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आज (ता. २३) शासन निर्देशानुसार कोरोनाच्या जे एन १ या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये, यासाठी वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान समितीतर्फे स्वामीभक्तांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. राज्यासह देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व अक्कलकोट नॉर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सतर्कता बाळगण्याच्या उद्देशाने मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना मास्कचे वाटप केले. पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी गतकाळात साधारणपणे गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावाची संसर्ग आटोक्यात आला होता. पण त्याचवेळी (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन) जागतिक आरोग्य संघटनेकडून पुढील काही वर्षात कोरोना पुन्हा डोके वर काढेल असे जाहीर करण्यात आले होते.

या अनुषंगानेच आता कोरोनाचा जे-एन१ हा नवा व्हेरिएंट आला आहे, म्हणून शासन निर्देशानुसार या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला लढा देण्यासाठी व पुन्हा मागच्या वेळेप्रमाणे सतर्कतेचे काही नियम पालन करणे गरजेचे आहे. कारण स्वामी समर्थांच्या या वटवृक्ष मंदिरात देशविदेशातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक येथील स्वामींच्या दर्शनाकरिता येत असतात.

दररोज स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे-मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, म्हणून आज येथील मंदिरात समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे व माझ्या हस्ते भाविकांना मास्कचे वाटप करण्यात आले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार आदींसह भाविक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT