laptop.jpg
laptop.jpg 
सोलापूर

नोकरी सोडून संगणक निर्मिती करणाऱ्या शहानवाजसमोर आता लॅपटॉप ब्रॅंडचे स्वप्न !

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शिक्षणासोबत संगणक सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून संगणक निर्मिती करत आता लॅपटॉप ब्रॅंड विकसित करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे, अशा भावना शहानवाज शेख याने व्यक्त केल्या. 
येथील तरुण उद्योजक शहानवाज शेख यांने महाविद्यालयीन शिक्षण घेत संगणक निर्मितीचा प्रवास त्याने उलगडला. 

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीला असताना उरलेल्या वेळात कॉम्प्यूटर हार्डवेअरचा डिप्लोमा कोर्स खाजगी संस्थेत शिकलो. त्यानंतर रोजच कॉम्प्यूटरची छोटीमोठी कामे करू लागलो. या अनुभवामुळे बारावी उत्तीर्ण होताच कंपनीत जॉब मिळाला. पण नोकरीमुळे माझी स्वतःची निर्मिती करता येणार नाही हे लक्षात येऊ लागले. मग स्वतःचा बिझिनेस आणी अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी अखेर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आधीच नोकऱ्या मिळत नाही तर सोडायची कशाला असे सांगणारे अनेक होते. 

पण शेवटी नोकरी सोडून बाहेर पडल्यानंतर व्यवसायासाठी धडपड सुरु झाली. जवळ भांडवलाचे पैसे नाही, ग्राहक कसे मिळवायचे अन कमाई किती होईल याचा काहीही अंदाज नव्हता. सुरुवातीला मिळालेले ग्राहक टीकवून धरण्यासाठी प्रयत्न करावे लागले. या पुर्वीची नोकरी व व्यवसायातील कमावलेले पैसे बॅंकेत ठेवले तेच वापरले. तेव्हा अचानक महेंद्र कांबळे भेटले. त्यांनी सर्व प्रकारची मार्गदर्शन व मदत केली. दुकान भाड्याने घेतले व तीन मुले कामावर येऊ लागली. काम असो किंवा नसो दुकानभाडे व मुलांचा पगार द्यावा लागत असे. अनेक वेळा बिझीनेस चालत नसल्याने मित्रांकडून रक्कम घेतली. कामे मिळाली की पैसे परत देऊ लागलो. 
कॉम्प्यूटर दुरुस्त करताना ग्राहकाच्या अपेक्षा समजू लागल्या. प्रत्यक्षात लोक जेव्हा संगणक घेतात तेव्हा त्यांना भरमसाठ किमंत मोजावी लागते. तसेच त्यांना आवश्‍यक नसलेल्या गोष्टीच जास्त मिळतात. ग्राहक जेव्हा संगणकाच्या खरेदीतील ही अडचण मांडत असल्याने त्यांच्या गरजावर आधारित पीसी तयार करता येऊ लागले. तसेच आवश्‍यक ती सर्व्हिस दिल्याने ग्राहक कायम समाधानी ठेवण्याचे कौशल्य आले. 
व्यवसाय उभा राहीपर्यंत घरच्यांना काहीही सांगितले नव्हते. मी शिक्षण घेतोय एवढेच घरच्यांना माहिती होते. अनेक दिवसानंतर मग आईबाबांना दुकान दाखवण्यासाठी घेऊन आला तेव्हा घरची मंडळी चकित झाली. बीसीए ची पदवी स्वतःच्या संगणक निर्मितीसोबत पूर्ण केली. संगणक निर्मितीनंतर आता स्वतःच्या लॅपटॉप निर्मितीचा ब्रॅंड करावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत असे शहानवाज आत्मविश्‍वासाने सांगतो.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT