vrukharpopan.jpg 
सोलापूर

जिल्ह्यातील अकरा बीज गुणन केंद्रांचे काम निधीअभावी झाले ठप्प

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ(सोलापूर)ः जिल्ह्यातील शासकीय रोपवाटिका व बीज गुणन केंद्रांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. विविध फळांची रोपे व बी-बियाणांची निर्मिती थांबली असून याचा मोठा तुटवडा पुढील वर्षी जाणवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. 

जिल्ह्यात मोहोळ, जेऊर, अक्कलकोट व पंढरपूर या ठिकाणी शासकीय रोपवाटिका आहेत. तर जिल्ह्यातील 11 ही तालुक्‍यांत बीज गुणन केंद्रे आहेत. रोपवाटिकेत डाळिंब, पेरू, सीताफळ, नारळ, आंबा, चिक्कू या कलमांच्या रोपांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना नाममात्र दरात दिली जातात. या सुविधेमुळे शेतकरी फळबाग लागवडीकडे वळला आहे. बीज गुणन केंद्रात तूर, उडीद, सोयाबीन, हरभरा, ज्वारी या पिकांच्या बियाणांची निर्मिती केली जाते. मात्र, दोन्ही कामांसाठी निधी नसल्याने बीज गुणन क्षेत्राची जमीन पडीक अवस्थेत आहे. 

फळबागा लागवडीसाठीच्या रोपासाठी शेतकरी रोपवाटिकेत चकरा मारत आहेत, मात्र रोपे मिळत नाहीत. गेल्या सुमारे वर्षभरापासून रोपवाटिका व बीज गुणन केंद्रास निधी वितरीत न केल्याने बियाणे व विविध रोपे निर्मितीचे काम थांबले आहे. अनेक बीज गुणन केंद्राचा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला आहे. निधीअभावी रखडलेली निर्मिती याचा परिणाम पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. शेतकऱ्यांना रोपे व बियाणे मिळणे अडचणीचे होणार आहे. शेतकऱ्यांच्या विश्‍वासू रोपवाटिकेला निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांची परवड थांबवावी, अशी मागणी खुद्द शेतकरीच आता करू लागला आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hailstorm Strong Wind : पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित; आंबा-मोसंबी बागांचे नुकसान

Parli Vaijnath News : परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांकडून अर्पण

Pune FDA Raid : भेसळखोरांवर ‘एफडीए’ ची धाड; सत्‍तेचाळीस लाखांचा संशयित खवा, पनीर आणि तूप जप्त

Wagholi Fraud News : नोकरी देतो म्हणून दिवाळखोर कंपनीत नोकरी देऊन अनेकांची ४४ लाख रुपयांची फसवणूक; दोन कंपन्यांच्या मालकासह संचालकांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update: देवळाई तांडा येथील तलावात तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT