सोलापूर

सोलापुरातील गुंठेवारी बांधकामे नियमितसाठी `ही` आहे "डेडलाइन' 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे नियमित करून घेण्यासाठी महापालिकेने 30 जून 2020 ची "डेडलाइन' दिली आहे. या कालावधीत नियमितीकरण न झाल्यास मूळ कर आणि कराच्या दुप्पट शास्ती असा तिप्पट कराचा बोजा मिळकतदारावर पडणार आहे. गुंठेवारी क्षेत्रात सुमारे 10हजार बांधकामे असल्याचा अंदाज आहे. 

नियमितीकरणासाठी लागतील ही कागपत्रे 
1 जानेवारी 2001 पूर्वी गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेल्या रेखांकनातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी बांधकाम परवाना विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी सात बारा उतारा, मिळकत पत्रिका, नोंदणीकृत खरेदी दस्त ऐवज, इंडेक्‍स टू, अनोंदणीकृत दस्त, बांधकाम किंवा भूखंड 2001 पूर्वीचा असल्याचा पुरावा, महापालिका किंवा ग्रामपंचायतचा कर भरल्याची पावती, वीजबिल, टेलिफोन बिल किंवा रेशनिंग कार्ड सादर करावे लागणार आहे. 

मुदतीत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 
अनधिकृत बिगरशेती वापर दंडाची कारवाई झाल्याबाबतचा पुरावा, गृहनिर्माण संस्थेतील भूखंड असल्यास संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र व प्लॉट ऍलाटमेंट पत्र, सोसायटी, फेडरेशन स्थापन असलेस त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक असणार आहे. संबंधित मिळकतदारांनी मुदतीत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन बांधकाम परवाना विभागातील सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी केले आहे. 

....तो पर्यंत होणार दुप्पट दंड 
स्थानिक नगरसेवकाचा दबाव किंवा आग्रहामुळे त्या वसाहतींमध्ये महापालिकेकडून नागरी सुविधा दिल्या जातात. अशा मिळकतींची नोंद मात्र महापालिकेत नसते. त्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या नागरिकांप्रमाणेच सुविधा देऊनही, संबंधित मिळकतींची केवळ पालिकेत नोंद नसल्याने, पालिकेला लाखो रुपयांच्या कराला मुकावे लागते. अनधिकृत बांधकाम जोपर्यंत अवैध म्हणून राहील, तोपर्यंत दरवर्षी अशा बांधकाम केलेल्या मिळकतींवर मालमत्ता कराच्या दुप्पट दंड लावला जाईल आणि तो वसूल केला जाईल. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT