फेब्रुवारीचे कॅलेंडर बदलत `या` महापालिकेने दिला दे धक्का !

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

यासाठी काढले आहे परिपत्रक 
सोलापूर महापालिकेत श्रीराम पवार व विक्रमसिंह पाटील हे दोन सहायक आयुक्त शासनाच्या आदेशानुसार रुजू झाले आहेत. त्यांच्या कार्यालय भेटीच्या दौऱ्याचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे.

सोलापूर : महापालिकेतील कार्यालयांची पाहणी 31 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात येणार असल्याचा फतवा काढून महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाने आपण "असामान्य' असल्याचे दाखवून दिले आहे. 

हेही वाचा - भूगोलाच्या पर्यटनामुळे.....

फेब्रुवारीत दाखवले 31 दिवस
लिपवर्ष वगळता फेब्रुवारीत 28 दिवस असतात याबाबत कुणाचे दुमत नाही. यंदा लिपवर्ष असल्याने फेब्रुवारीत 29 दिवस आले आहेत. त्यात महापालिकेने मोठी सुधारणा करीत यंदाच्या फेब्रुवारीत 31 दिवस आल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पाच दिवसांचा आठवडा होणार असल्याने आनंदी झालेल्या कर्मचाऱ्यांकडून हा प्रकार झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात माहिती घ्यायची म्हटले की, अनावधनाने चूक झाली, असे सांगितले जाईल. मात्र फेब्रुवारीत 28 दिवस असतात की 31 दिवस याची माहिती नसलेला कर्मचारी जर संगणक चालक असेल तर दिव्यच आहे. ही चूक एखाद्या कायम कर्मचाऱ्यांकडून झाली असेल तर त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

महापालिका गैरप्रकारामुळे चर्चेत
सध्या महापालिका अनेक गैरप्रकारामुळे चर्चेत आहे. पदाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांचे त्यांच्याखालील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला जे वाटते तसे काम करतो. एका कर्मचाऱ्याने तर विभागीय कार्यालय क्रमांक आठमध्ये जाऊन संगणकाचा माऊस काढल्याची घटना झाली आहे. मात्र त्याबाबतही तेथील वरिष्ठांनी बघ्याची भूमिका घेतली. या तारखेचा घोळ आता कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या माथी मारला जाईल. कारवाई करण्याचे संकेत दिले जाईल, प्रत्यक्षात काहीच होणार नाही. सर्वकाही आलबेल असल्याचेच सांगितले जाईल. त्यास महापालिकेतील पदाधिकारी तितकेच कारणीभूत आहेत. सभागृहात दिलेल्या आदेशाची कार्यवाही प्रशासनाकडून होते की नाही याचाही पाठपुरावा त्यांच्याकडून होत नाही. सभा झाली की संपले असे सध्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - डाॅक्टरने मागितली बायकोची माफी

यासाठी काढले आहे परिपत्रक 
सोलापूर महापालिकेत श्रीराम पवार व विक्रमसिंह पाटील हे दोन सहायक आयुक्त शासनाच्या आदेशानुसार रुजू झाले आहेत. त्यांच्या कार्यालय भेटीच्या दौऱ्याचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामध्ये 31 फेब्रुवारी 2020 रोजी ते भूमी व मालमत्ता विभागाला भेट देतील असा उल्लेख करण्यात आला आहे. फेब्रुवारीत 31 तारीख येतच नसल्याने श्री. पवार आणि श्री. पाटील या दोघांनी भूमी व मालमत्ता विभागाला भेट दिल्याचे कागदोपत्री दाखविण्याचा प्रयत्न तर नसेल ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur municipal corporation change the calendar of february