in summer diabetic patients should increase water intake
in summer diabetic patients should increase water intake Sakal
सोलापूर

Solapur : उन्हाळ्यात मधूमेहींनी भरपूर पाणी पिण्याची गरज; शुगर नियंत्रणात नसलेल्यांना डिहायड्रेशनचा धोका जास्त

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : बहुतांशी मधुमेह असलेले रुग्ण वयस्कर असतात. सध्या उन्हाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी भरपूर पाणी प्यावे. ज्यांची शुगर नियंत्रणात नाही त्यांना डीहायड्रेशनचा धोका जास्त असतो. अशा रुग्णांनी नियमितपणे आपली शुगर तपासणी करून शुगर नियंत्रित ठेवली पाहिजे.

मधुमेही रुग्णांनी उन्हाळ्यात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अति महत्त्वाचे काम असल्यास सकाळी ११ च्या आत संपवावे. ज्या ठिकाणी कुलर अथवा थंडाव्याची सोय आहे अशा ठिकाणी वावरावे. उन्हाळ्यात ज्यूस न पिता फळे खाण्यावर जास्त भर द्यावा. साखरयुक्त ज्यूस पिणे टाळावे. रोजच्या जेवणात दही व ताकाचे प्रमाण वाढवावे.

मधूमेहाचे प्रकार इन्सुलिन डिपेंडंट

इन्सुलिन डिपेंडंट या प्रकारात अनुवंशिकता हे मुख्य कारण असते. यामध्ये इन्सुलिन रुग्णाच्या शरीरात योग्य प्रमाणात तयार होत नाही. यामध्ये पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल्स (ग्रंथी) इन्सुलिन तयार करतात. मधुमेहाची अनुवंशिकता पुढच्या पिढीत जाऊ नये यासाठी सध्या कोणतेही उपचार नाहीत परंतु अनुवंशिकतेच्या दोषाच्या प्रमाणावर इन्सुलिन डिपेंडंट मधुमेहाचे उपचार ठरतात.

इन्सुलिन रेझिस्टन्स

इन्सुलिनचे प्रमाण शरीरात योग्य असते. मात्र त्याचा परिणाम प्रभावीपणे होत नाही. अशा प्रकारचा मधूमेह होण्याची प्रमुख कारणे म्हणजे रुग्णाच्या शरीराची जाडी अधिक असणे, व्यायामाची कमतरता, झोप न होणे, अवेळी आहार घेणे, आहारात फास्ट फूडचे जास्त प्रमाण ही प्रमुख कारणे आहेत. या प्रकारच्या रुग्णांनी योग्य काळजी घेतल्यास त्यांना मधुमेहावर पूर्णपणे नियंत्रण करणे शक्य आहे.

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी शुगर फ्री चहा, कॉफी घेतली पाहिजे. याबरोबरच डायबेटिक डाएट देखील गरजेचा आहे. गुळ साखर हे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य केले पाहिजेत. आहारात ज्वारीची भाकरी व भाताचे प्रमाण अत्यल्प असले पाहिजे.

फळांमध्ये केळी, आंबा, द्राक्षे खाणे पूर्णपणे टाळायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळचा नाश्ता व दोन वेळचे जेवण योग्य आहारासह वेळेत घेणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज कमीत कमी ४५ मिनिटे चालणे हा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे.

- डॉ. मुक्तेश्वर शेटे, मधुमेह तज्ज्ञ, शेटे क्लिनिक

गेल्या दहा वर्षांपासून मला मधुमेह आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करत आहे. त्यामुळे सध्या मधुमेहावर मला नियंत्रण मिळवता आले आहे. याबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य आहार वेळेत घेतल्यामुळे तीन वर्षांपासून माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य व नियंत्रणात आहे.

- पालाक्षी कारीमुंगी, मधुमेह रुग्ण

उन्हाळ्याच्या दिवसात रुग्णांचा आहार कमी झाल्याने शुगर साधारण पातळीपेक्षा खाली येते. त्यामुळे हायपोग्लायसेमियाचा त्रास होऊ शकतो. मधुमेह असणाऱ्यांनी शक्यतो उन्हाचे प्रमाण कमी असताना व्यायाम करावा. व्यायामादरम्यान पाणी प्यावे. उन्हाळ्यात उष्ण जमिनीमुळे मधुमेह असणाऱ्यांच्या पायाला जखम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांनी योग्य बूट अथवा चपला वापराव्यात.

- डॉ. संतोष मोटे, मधुमेह तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

Dhule Lok Sabha Election : मोदी- गांधी यांच्यापैकी कुणाची जादू चालणार?

SCROLL FOR NEXT