It is difficult for Sangola taluka to get beds for the treatment of corona patients
It is difficult for Sangola taluka to get beds for the treatment of corona patients 
सोलापूर

लक्षणे नसणाऱ्या रुग्णांमध्ये गांभीर्य दिसेना; अत्यवस्थांना बेड मिळेना 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. लक्षणे असणाऱ्या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेड मिळणे मुश्‍कील झाले आहे. एकीकडे लक्षणे नसणारे रुग्ण याकडे गांभीर्याने पाहत नाहीत, तर दुसरीकडे लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी (बेडसाठी) घरच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र सांगोल्यात दिसत आहे. 
तालुक्‍यात 29 सप्टेंबरपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1812 झाली आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये कोणतेच उपचार मिळत नसल्याचे समजून याबाबत अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत. दुसरीकडे तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणेही कठीण झाले आहे. बेडसाठी नातेवाईकांना अनेक ठिकाणी फिरावे लागत असल्याने याबाबत नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बेड मिळाल्यानंतरही अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्याचे नातेवाईक बोलत आहेत. बेडची माहिती नातेवाईकांना मिळत नसल्याने प्रशासनाने स्थानिक पातळीवर बेडची सुत्रे हाती घेऊन तालुका पातळीवर कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्याची माहिती नातेवाईकापर्यंत पोहोचण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे. 
कोविड रुग्ण हॉस्पिटलला घेऊन गेल्यावर त्यांना तेथे बेड नसल्याचे सांगितले जात असल्याने काही जण सोलापूर, पुणे, सांगलीची वाट धरत आहेत. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागत असल्याने रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्‍यता असते. शिवाय सर्वांना बेडची माहिती मोबाईलवर मिळाली तर रुग्णाला घेवून विविध हॉस्पिटलचे उंबरठे झिजवण्याची वेळ नातेवाईकांवर येणार नाही. ज्याप्रमाणे दररोज कोरोना रुग्णांची माहिती दिली जाते त्याचप्रमाणे बेडची माहिती मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने करण्याची गरज असल्याचे सांगोला तालुक्‍यातील जनतेतून बोलले जात आहे. 
लक्षणे असणाऱ्यांना (अत्यवस्थ रुग्णांना) सध्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे. खाजगी रुग्णालयातील एका दिवसाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असल्याने अत्यवस्थ असलेल्या सर्वसामान्य रुग्णांवर उपचारासाठी कोविड हेल्थ सेंटरची उभारणी करण्यात, यावी अशी मागणी होत आहे. अत्यवस्थ नागरिकांना एकीकडे बेड मिळत नाहीत, मिळाला तर खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही अशा अनेक समस्या सध्या रुग्णांच्या नातेवाइकांना आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील अत्यवस्थ रुग्णांसाठी कोविंड हेल्थ सेंटरची उभारणी करावी अशी मागणी होत आहे. 

ना मास्क, ना सोशल डिस्टन्स 
सांगोला तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही अनेकजण मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र दिसत आहे. कित्येक जण मास्क न लावता, सोशल डिस्टन्सचे पालन न करता मोठ्या प्रमाणात बाजाराच्या ठिकाणी, किराणा-कापड दुकान एकत्रित येत असल्याचे दिसून येत आहेत. प्रशासनाकडून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर व व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : 'अब 400 पार'ला लागले ग्रहण! अजूनही भाजप बहुमतापासून दूर, इंडियाकडे काय आहे कल?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? अपेक्षेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला अत्यल्प मतदान

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या रिंगणातील कलाकारांची प्रतिष्ठा पणाला; कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? जाणून घ्या एक क्लिकवर

Odisha Election Result: ओडिशामध्ये मोदीराज? नवीन बाबू पिछाडीवर, भाजपला मिळालं बहुमत

पहिल्या पाच फेऱ्यात आमदार प्रणिती शिंदे अन्‌ राम सातपुतेंना किती मतदान, कोणत्या मतदारसंघातून किती मतदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT