Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या रिंगणातील कलाकारांची प्रतिष्ठा पणाला; कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? जाणून घ्या एक क्लिकवर

Lok Sabha Election Result 2024: कोणते कलाकार हे सध्या आघाडीवर आहेत? आणि कोणते कलाकार हे पिछाडीवर आहेत? याबद्दल जाणून घेऊयात....
लोकसभेच्या रिंगणातील कलाकारांची प्रतिष्ठा पणाला; कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? जाणून घ्या एक क्लिकवर
Lok Sabha Election Result 2024: sakal

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election Result 2024) निकाल आज लागणार आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अवघ्या देशाचे लक्ष सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. अशातच यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये काही कलाकारांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांच्यापासून ते बॉलिवूड क्विन कंगना रनौतपर्यंत (Kangana Ranaut), अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आता या कलाकारांनीपैकी कोणते कलाकार हे सध्या आघाडीवर आहेत? आणि कोणते कलाकार हे पिछाडीवर आहेत? याबद्दल जाणून घेऊयात....

कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

  • शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.

  • गोरखपूरमधून भाजपचे रवी किशन आघाडीवर आहेत.

  • मंडीतून भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौत आघाडीवर आहे.

  • भोजपुरी कलाकार आणि बिहारमधील करकट येथील अपक्ष उमेदवार पवन सिंह पिछाडीवर आहेत.

  • मेरठमधून भाजपचे उमेदवार आणि अभिनेता अरुण गोविल आघाडीवर आहेत.

  • ईशान्य दिल्लीतून भाजपचे उमेदवार मनोज तिवारी आघाडीवर आहेत.

  • आसनसोलमधून टीएमसीचे उमेदवार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर आहेत.

  • मथुरेतून भाजप उमेदवार आणि अभिनेत्री हेमा मालिनी आघाडीवर आहेत.

  • ईशान्य दिल्लीतील भाजपचे उमेदवार मनोज तिवारी आघाडीवर आहेत.

लोकसभेच्या रिंगणातील कलाकारांची प्रतिष्ठा पणाला; कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? जाणून घ्या एक क्लिकवर
Mandi Constituency Lok Sabha Election Result: कंगना की विक्रमादित्य सिंह? मंडीत कोण मारणार बाजी? ‘टिक्का साहेब’ अन् क्वीनमध्ये काटे की टक्कर

कंगनानं आईचा घेतला आशीर्वाद

कंगना रनौतनं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो सोशल मीडियावर या फोटोमध्ये कंगना तिच्या आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. कंगनानं या फोटोला कॅप्शन दिलं आहे, "आईचा आशीर्वाद, आई ही देवाचे रुप आहे."

कंगना राणौत
kangana ranautsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.