Mahavitaran new plan to curb power theft Aerial bunch conductor cables in 50 villages in Mohol
Mahavitaran new plan to curb power theft Aerial bunch conductor cables in 50 villages in Mohol Sakal
सोलापूर

Solapur News : वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणची शक्कल; मोहोळमधील ५० गावात एरियल बंच कडक्टर केबल

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीजचोरी रोखण्यासाठी व विजेच्या धक्क्याने होणारे अपघात टाळण्यासाठी गावोगावी एरियल बंच कंडक्टर केबल टाकण्याचा निर्णय घेतला असून, मोहोळ शहरासह तालुक्यातील ५० हून अधिक गावात लवकरच या कामास सुरवात होणार आहे.

दरम्यान या कामासाठी तालुक्यासाठी १४८ कि.मी. केबल मंजूर झाली असून, संबंधित ठेकेदारास संपूर्ण आराखडा दिला असल्याची माहिती मोहोळ येथील महावितरणचे अभियंता शीतल वनारसे यांनी दिली.

एरियल बंच कंडक्टर केबल बसविण्यामागचा मुख्य हेतू वीजचोरी रोखणे व वीज धक्क्यापासून होणारे अपघात टाळणे हा आहे. ग्रामीण भागात गावात, गल्लोगल्ली, वाड्या वस्त्यांवर विद्युत खांबावरील तारांवर हूक टाकून मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जाते. सायंकाळी याचे प्रमाण अधिक असते.

सकाळी ते काढून ठेवले जातात, त्यामुळे वीजचोरी पथकाला कारवाई करताना अडचणी व बंधने येतात. त्यामुळे वीजचोरी रोखणे अवघड ठरते. मोठ्या प्रमाणात वीजचोरी होणाऱ्या भागात तसेच ग्रामीण भागातील मुख्य रस्ते जिथे नागरिकांची नेहमी वर्दळ असते, शाळा, गावठाण परिसर अशा ठिकाणी विजेच्या धक्क्याने अथवा काही वीज तारेपासून होणारा संभाव्य अपघात होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी ही केबल बसविण्यात येणार आहे.

महावितरणच्या लाइनमनने गावोगावी वीजचोरी होणाऱ्या भागाचे तसेच संभाव्य अपघात होणाऱ्या ठिकाणचे सर्व्हे केला असून, तो संबंधित ठेकेदारास आम्ही दिला आहे. मोहोळ तालुक्यासाठी १४८ कि.मी. एरियल बंच कंडक्टर केबल मंजूर असून, मोहोळ शहरासह तालुक्यातील मोठया गावात या केबलचा उपयोग करण्यात येणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी ही केबल बसविण्यात येईल त्या खांबावर वीज प्रवाहाच्या तारा राहणार नसून, फक्त एकच केबल राहणार आहे. या केबलमध्ये तीन फेज असून त्यावर जाड आवरण असल्याने वीज चोरांना हूक टाकून वीज चोरी करणे अशक्य होणार आहे. सध्या तालुक्यातील फिडर ओव्हर, सबस्टेशन ओव्हरची कामे सुरू असून ती आटोक्यात आली की या कामास अधिक वेग येईल असेही वनारसे यांनी सांगितले.

एरियल बंच कंडक्टर हा उपक्रम तालुक्यातील मोठ्या गावात अगोदर राबविण्यात येणार आहे. यामुळे वीज चोरीला मोठा आळा बसणार आहे, तसेच विजेच्या माध्यमातून होणारे अपघात कमी होणार आहेत. नागरिकांनी वीज चोरी करू नये.

- शीतल वनारसे, सहायक अभियंता, विद्युत वितरण कंपनी, मोहोळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT