solapur
solapur sakal
सोलापूर

Mangalwedha : मंगळवेढा तालुका कृषी विभागात 33 पदांची भरती अपूर्ण ;कृषीच्या योजना राबविताना येतेय अडचण,रिक्त पदे भरण्याची गरज

महेश पाटील

सलगर बुद्रुक,(जिल्हा सोलापूर) मंगळवेढा तालुक्याच्या शेती क्षेत्राचा बोजा वाहणाऱ्या कृषी विभागात मंजूर 84 पदांपैकी 33 पदांची भरती प्रक्रिया अपूर्ण असल्याने शासनाच्या शेतीसाठी वाहिलेल्या विविध योजना राबिविताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येने कार्यभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.त्याचा परिणाम योजना राबिविताना स्पष्टपणे जाणवत असल्याने लवकरात लवकर मंजूर पदांची भरती प्रक्रिया पार पडावी व कृषी विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ज्वारीचे आगार म्हणुन राज्यात मंगळवेढ्याचे नाव आहे.तसेच डाळींब व द्राक्ष पिकांच्या बाबतीतही मंगळवेढयातील शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात आपला ठसा उमटवला आहे.तालुक्यात 81 गावे आहेत.या गावांमधील 1 लाख 14 हजार 161 हेक्तर इतके भौगोलिक क्षेत्र आहे.यामध्ये लागवडी लायक 10 लाख 6 हजार 181 हेक्तर क्षेत्र आहे.तर शेतकरी खातेदारांची संख्या 73 हजार 195 एवढी आहे.दरम्यान या एकूण क्षेत्रांपैकी 6 हजार 800 हेक्तर वर द्राक्ष,डाळींब,चिक्कू,आंबा,पेरू आदी फळबागायती क्षेत्र आहे. जिल्ह्याच्या शेतीक्षेत्रात व उत्पादनात वेगळा ठसा उमटवलेल्या मंगळवेढा तालुक्यातील कृषी विभागात रिक्त पदांमुळे अडचणी येत आहेत.

रिक्त पदे-कृषी सहायक 16,अनुरेखक 6,वरिष्ठ लिपिक 1,लिपिक 4,जीपचालक 1,शिपाई 5 अशी मिळून 33 पदे रिक्त आहेत.

गणेश श्रीखंडे,तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा- क्षत्रिय स्तरावरील एकूण 16 कृषी सहाय्यकांची पदे रिक्त असल्याने योजना राबवण्यात अडचणी येत आहेत परंतु इतर कृषी सहाय्यकांकडे अतिरिक्त पदभार देऊन तात्पुरते कामकाज सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT