market commitee election solapur
market commitee election solapur sakal
सोलापूर

Solapur News : दामाजीप्रमाणे समविचारी लढवणार बाजार समिती निवडणूक

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : दामाजी कारखान्यात समविचारी आघाडीच्या माध्यमातून घडवलेले परिवर्तन हे धक्कादायक ठरले म्हणून दामाजी नंतरच्या मोठ्या सहकारी संस्थेत गत निवडणुकीत चुका दुरुस्त करून निवडणुकीला सामोरे जाताना परिवर्तनाचा निर्धार करावा असा असे आवाहन राष्ट्रवादी नेते भगीरथ भालके यांनी केले.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक येथील शिशुविहार येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात,दामोदर देशमुख,रामचंद्र वाकडे,अरूण किल्लेदार,लतीफ तांबोळी,चंद्रशेखर कौडूभैरी,अजित जगताप,सोमनाथ माळी,

औदुंबर वाडदेकर,युन्नुश शेख,संजय कट्टे,रेवणसिध्द लिगाडे,गौरीशंकर बुरकुल,गोपाळ भगरे,दयानंद सोनगे,मुरलीधर दत्तू,बसवराज पाटील,दिगंबर भाकरे,प्रविण खवतोडे,जालींदर व्हनुटगी,गुलाब थोरबोले,धनाजी बिचुकले, माधवानंद आकळे,चंद्रकांत काकडे,दत्तात्रय खडतरे,संतोष माने,दौलत माने आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भालके म्हणाले की,गत निवडणुकीत ग्रामीण भागात न पोहोचल्यामुळे पराभवास सामोरे जावे लागले.समविचारी आघाडी एकत्रित आल्यावरही विरोधकांनी पाच हजाराच्या पुढे मोजा असे आव्हान दिले.तरीही सभासदांनी 3 हजारांनी विजय दिला.उद्याच्या निवडणुकीत सभासदापर्यत योग्य भुमिका मांडली तर विजयी होऊ शकतो.

असा विश्वास दिला.अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की समविचारी आघाडीच्या ताब्यात शेतकऱ्याची मोठी संस्था असलेला दामाजी कारखान्याचा कारभार दिला. दिलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करताना ऊस उत्पादकाची बिले 31 मार्चपूर्वी दिल्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहार करणे सोयीचे झाले.

त्याप्रमाणे शेतकऱ्यांची दुसरी मोठी संस्थाही शेतकऱ्याच्या ताब्यात राहावी. माजी नगरसेवक अजित जगताप म्हणाले की, समविचारी आघाडीच्या ताब्यात दामाजीचा कारभार दिला.संचालकांनी चांगल्या पध्दतीने काम करत ऊस उत्पादकाची बिले वेळेत दिली.हा समविचारीचा पॅटर्न राज्यभर चर्चेला गेला.

बाजार समितीची निवडणूकही समविचारीच्या माध्यमातून लढवण्याचा विश्वास उपस्थितांना दिला.अॅड संतोष माने म्हणाले की सोसायटीत व ग्रामपंचायत मध्ये आपलं बहुमत आहे आपले उमेदवार शंभर टक्के निवडून येतील व बाजार समितीवर सविचारी सत्ता येईल, दत्तात्रय खडतरे म्हणाले की कोणताही कार्यकर्ता फुटलेला नाही विरोधक केवळ अफवा उठवण्यात व्यस्त आहेत अफवांना कोणीही बळी पडू नये.

यावेळी संचालक औदुंबर वाडदेकर,लतीफ तांबोळी,गुलाब थोरबोले यांची भाषणे झाले आभार चंद्रशेखर कौडूभैरी यांनी मानले, दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने विजय संपादन केला त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही योग्य आणि कार्यक्षम उमेदवार निश्चित करून ही निवडणूक समविचारी आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीची निवडणूक लढवणार असल्याचा दावा युन्नुश शेख यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT