Crime
Crime sakal
सोलापूर

Mohol Crime : बालविवाह लावून दिलेल्या सहा जणांविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

राजकुमार शहा

मोहोळ - डॉक्टरांच्या व पोलिसांच्या सतर्कते मुळे बालविवाह लाऊन दिलेल्या भटजीसह सहा जणांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, पीडित बालिका ही 1 डिसेंबर रोजी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात टी टी चे इंजेक्शन घेण्यासाठी सासू व पती सोबत आली होती. डॉक्टरांना तिच्या वया बाबत संशय आल्याने त्यांनी तिच्या आधार कार्ड वरील जन्म तारीख पाहिली त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले, तर ती गर्भवतीही असल्याचे समजले.

दरम्यान डॉक्टरांनी ही घटना मोहोळ पोलिसांना कळविली. मोहोळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अंजना फाळके यांनी सदर बालिकेकडे चौकशी केली असता, ती अल्पवयीन असताना तिच्या नातेवाईकांनी तिचा विवाह लावून दिल्याचे तिने सांगितले.

त्यानुसार सदरची घटना मोहोळ पोलिसांनी सोलापूर येथील महिला व बालकल्याण समिती यांना कळविली. त्यानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे यांनी याबाबत मोहोळ पोलिसात तक्रार दिली. त्या तक्रारी वरून पीडित गर्भवती बालिकेच्या सासू-सासरे, आई-वडील, पती व विवाह लावून देणारा भटजी अशा सहा जणाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांचे संशयतांचा शोध घेण्यासाठी पथक गेले असता ते मिळून आले नाहीत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती फाळके पोलीस कॉन्स्टेबल खवतोडे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT