सोलापूर

कोरोना इफेक्ट ः नातेवाईक, मित्रमंडळींची चंगळ... का? 

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : दूध संकलन करणाऱ्या दूध डेअरी चालकांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध नाकारल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या ग्रामीण भागात घरोघरी दुधाचा खवा करून तो नातेवाईक व मित्रमंडळींना फुकट वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे खवा घेता का खवा, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

शेतीचा व प्रापंचिक खर्च भागावा यासाठी ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो. त्यासाठी जर्सी गाई व म्हशींचा सांभाळ केला जात आहे. त्यांना हिरवा चारा म्हणून शेतात मका पिकवली जाते. सध्या सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागात एक दूध उत्पादक डेअरीला एका वेळी दररोज कमीत कमी 50 ते 60 व जास्तीत जास्त 200 ते 250 लिटर दूध वाढतो. 

गेल्या चार-पाच दिवसांपासून दूध संकलन करणाऱ्या डेअरी चालकांनी दूध उत्पादकांकडील दूध घेणे बंद केले आहे. कारण, या ठिकाणी दूध संकलन करून ते बाहेर पाठविले तर तीन ते चार दिवस दुधाचा टॅंकर रिकामा होत नाही, तर टॅंकर चालकांना सर्व बंद असल्याने जेवण मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे ते दूध वाहतुकीचा व्यवसाय बंद करून घराकडे निघाले आहेत. सध्या दुधाचे संकलन करणाऱ्यांनी दुधाचे दर कमी केले आहेत. मात्र जनावरांना लागणारे पशुखाद्य व वेगवेगळी पेंड, मका भरडा यांचे दर वाढीव आहेत, शासनाने त्यांचे दर कमी करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

दूध संकलन करणारे दूध घेत नसल्याने घरोघरी आता चुली मांडून त्यावर पदरचे सरपण जाळून खवा करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे जनावरांची देखभाल करता करता दुधाचा खवा करण्याचे जादा काम वाढल्याने घरातील कारभारीन वैतागली आहे. दुधाचा खवा तयार करावयाचा, त्याचे गुलाबजामून व शक्‍य असलेले अन्य पदार्थ तयार करावयाचे व ते नातेवाईक व मित्रमंडळींना फुकट वाटायचे, कारण एक तरी जर्सी गाईचा खवा कोण घेत नाही, कमी भावात द्यायचा म्हटले तर सर्व हॉटेल बंद आहेत, त्यामुळे पदरचे सरपण जाळून वेळ घालवून खवा तयार करायचा व तो फुकट वाटायचा, असा तिहेरी तोट्याचा धंदा दूध उत्पादकांचा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागील संकटाची मालिका संपता संपेना. 


आमचे दररोज 60 लिटर दूध आहे. मी ते दूध आटवून खवा करतो व नातेवाईक आणि मित्रांना फुकट वाटतो. 
- नारायण भोसले, दूध उत्पादक, पापरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT