solapur
solapur  sakal
सोलापूर

Solapur News : हद्दवाढ भागातही आता तिसऱ्या डोळ्याची नजर

ऋषिकेश साळवी

सोलापूर : महापालिकेचे विश्‍वस्त आणि प्रशासन यांच्या अवकृपेमुळे आजवर तीन दशके विकासापासून वंचित राहिलेल्या हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी सकारात्मक तसेच दिलासा देणारी ही वार्ता आहे. शहराच्या दुर्लक्षित विस्तारित भागावर आता तिसऱ्या डोळ्याची म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

दहा कोटींच्या खर्चातून साधारण ४० चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यातून हा भाग सुरक्षेच्या कक्षात येईल. मुख्य चोरींच्या घटनांसह समाजातील अप्रिय घटनांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिस प्रशासनाला मदत होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मोठा हातभार लागेल.

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सोलापूर शहरातील मुख्य १३० चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान शहराच्या उर्वरित परिसरासह हद्दवाढ भागातील मुख्य ४० चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठीच्या वाढीव १० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मान्यता मिळाली आहे.

सोलापूर शहरातील मुख्य १६ चौकांत स्मार्ट ट्रॅफिक सिस्टिम आणि १३० ठिकाणी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे सीसीटीव्ही कॅमेरे स्मार्ट सिटी योजनेतून बसविण्यात येत आहेत. यासंबंधीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षेच्यादृष्टीने शहर हद्दवाढ भागातील चौकदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याने दुसऱ्या टप्प्यात दहा कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.

या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून हद्दवाढ भागातील ४० चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांमुळे घडलेल्या घटनांचा तपास करण्याला पोलिसांना अत्यंत मदत होणार आहे. शिवाय समाजघातकी प्रवृत्तींवर आळा बसविण्यालादेखील मदत होईल. चुकीच्या गोष्टींवर निर्बंध आणता येतील. तसेच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होईल. एकूणच मुख्य सोलापूर शहरासह हद्दवाढ भागदेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येऊन सुरक्षेच्या कक्षेत येईल.

सुरक्षेसाठी ४६ कोटींची उड्डाणे अन्‌ फायदेच फायदे...

सोलापूर शहर सुरक्षीत होण्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेतून तब्बल ४६ कोटी रुपये खर्चून येथे कमांड कंट्रोल सिस्टिम उभारण्यात येत आहे. सोलापुरातील सुरक्षा आणि वाहतुकीच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि यंत्रणा बसविण्याची ही योजना आहे. चौका-चौकातील वाहतुकीच्या नियंत्रणासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर कमांड कंट्रोल सेंटरमधून पथदिव्यांचे जिओ टॅग, घनकचरा, घंटागाड्या, पाणीपुरवठ्यासारख्या जीवनावश्यक बाबीची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सहा बाय दोन फुटाच्या स्क्रिनची उभारणी होत आहे. या योजनेतून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

सुरक्षेसाठी ४६ कोटींची उड्डाणे अन्‌ फायदेच फायदे...

सोलापूर शहर सुरक्षीत होण्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेतून तब्बल ४६ कोटी रुपये खर्चून येथे कमांड कंट्रोल सिस्टिम उभारण्यात येत आहे. सोलापुरातील सुरक्षा आणि वाहतुकीच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि यंत्रणा बसविण्याची ही योजना आहे. चौका-चौकातील वाहतुकीच्या नियंत्रणासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर कमांड कंट्रोल सेंटरमधून पथदिव्यांचे जिओ टॅग, घनकचरा, घंटागाड्या, पाणीपुरवठ्यासारख्या जीवनावश्यक बाबीची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सहा बाय दोन फुटाच्या स्क्रिनची उभारणी होत आहे. या योजनेतून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

सोलापुरात ६०० संवेदनशील ठिकाणे

स्मार्ट सिटी योजनेतून सीसीटीव्ही कॅमेरे आणि यंत्रणा बसविण्याचा विषय पोलिस प्रशासन आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गी लावले जात आहे. शहरातील चौक, उद्याने, रेल्वे स्टेशन परिसर, मंदिर, शाळा, बाजारपेठा, मॉल, बँका, पतसंस्था, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे, हॉस्पिटल, सराफ बाजार, पोलिस चौक्यांसह काही महत्त्वाच्या सोसायट्या अशा शहरातील एकूण ६०० संवेदनशील स्थळांची यादी यापूर्वी पोलिसांनी महापालिकेस दिली. त्यानुसार, शहरातील मुख्य १३० चौकात स्मार्ट सिटी योजनेतून ३३२ कॅमेरे लावण्यात येत आहेत.

स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील १३० चौकांमध्ये ३३२ कॅमेरे लावले जात आहेत. मात्र, शहरात आणखी काही महत्त्वाची चौक आहेत. त्या ठिकाणी कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे दहा कोटी रुपये निधीच्या मागणीचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला मान्यताही दिली आहे. त्यानंतर संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत येईल.

— शीतल तेली उगले, आयुक्त, सोलापूर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT