Salgar Budruk School
Salgar Budruk School sakal
सोलापूर

Salgar Budruk News : शाळा सजल्या गुणवत्तेचे काय; गुणवतेच्या शोधात विध्यार्थी जात आहेत जिल्ह्याबाहेर

महेश पाटील

सलगर बुद्रुक (जि. सोलापूर) : शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत सलगर बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत लोकवर्गणीतून सजावटी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे शाळेचे रुपडे बदलले आहे. पण शैक्षणिक गुणवत्तेत या शाळेचे योगदान खूप कमी आहे. त्यामुळे वरवरच्या सजावटी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्मज्ञानात किती भर पडतेय हे पाहणे गरजेचे आहे.

गावचे विध्यार्थी शाळेसाठी बाहेरच्या जिल्ह्यात -

सलगर बुद्रुक येथील जे पहिली ते चौथी च्या वर्गात शिकणारे बरेच विध्यार्थी शेजारील सांगली जिल्ह्यातील उमदी गावच्या कोडगवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत भाड्याने गाडी करून जातात. याबाबत पालकांना विचारले असता, जिकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते तिकडे मुलांना शाळेत घातले असे सकाळला सांगण्यात आहे.

त्यामुळे गावात झेडपीची शाळा असताना देखील गाड्या भरून विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यात शिक्षणासाठी जात असतील तर ती सोलापूर झेडपीच्या शिक्षण विभागाचे अपयश आहे असे गावातील सुज्ञ नागरिकांना वाटते. आणि दरवर्षी सांगली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे.

स्पर्धा परीक्षांचा नावाने चांगभलं -

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षेची तयारी प्राथमिक शिक्षण घेताना बालमनावर होणे गरजेचे आहे. परंतु सदरच्या शाळेचा स्पर्धा परीक्षेचा निकाल तालुक्यातून शेवटचा असतो. याबाबत गावकऱ्यांनी वेळोवेळी आवाज उठवला पण गुणात्मक प्रगती शून्य टक्के आहे. त्यामुळे शाळेच्या या बकाल अवस्थेला शाळेतील शिक्षकांबरोबरच मंगळवेढा शिक्षण विभागातील झारीचे शुक्राचार्य जबाबदार आहेत.

शाळेच्या प्रगतीचा आढावा तालुका गटशिक्षण अधीकारी यांनी घेण्याची गरज असताना त्यांच्याकडूनही पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अधोगतीला जबाबदार कोण असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.

पांडुरंग चव्हाण, पालक सलगर बुद्रुक -

माझी स्वताची मुलगी या शाळेत शिकत आहे. पण शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आहे.त्यामुळे सलगर बुद्रुक मधील पहिली ते चौथीच्या शाळेत शिकणारे बरेच विद्यार्थी सांगली जिल्ह्यातील शाळेत जात आहेत. शासनाच्या सोइ सुविधा सर्व शाळांना सारख्याच मिळतात पण सलगरच्या शाळेत गुणवत्तेचा अभाव का आहे? याला कोण जबाबदार आहे. याची चौकशी करून शिक्षण विभागाने योग्य ती कार्यवाही केली पाहिजे. व शाळेला पूर्वीचे गत वैभव परत मिळाले पाहिजे. माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात शाळा सजवायला कांही हरकत नाही पण गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड असायला नको आहे.

विश्वनाथ वाघमारे, मुख्याद्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा सलगर बुद्रुक -

शाळेची गुणवत्ता ढासळली आहे हे खरे आहे. पण मी पदभार स्वीकारल्यापासून चालू शैक्षणिक वर्षात स्पर्धा परीक्षेची जादा तास घेणे, मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे सुरू आहे. शाळेची घसरलेली पातळी भरून काढण्यासाठी ग्रामस्थांचेही वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT