solapur crime 
सोलापूर

'ती' प्रियकराला म्हणाली मला पळवून घेऊन जा...

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर : येथील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दोन मुली शुक्रवारी (ता. 13) अकाउंट विषयाच्या पेपरसाठी घराबाहेर पडल्या. त्यातील एक मुलगी रागात हुबळीला गेली तर दुसरी प्रियकरासोबत पळून गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्यातील एक मुलगी पोलिसांना सापडली असून तिची रवानगी बाल कारागृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही नक्‍की वाचा : बळीराजाची कोंडी ! कर्जमाफीनंतरही 39 लाख शेतकरी थकबाकीतच


मुलासोबत त्या मुलीचे प्रेम होते. दरम्यान, दहावी झाल्यानंतर मुलीचा विवाह लावून देण्याचे नियोजन पालकांनी केले. तत्पूर्वी, पालकांनी त्या मुलीचा विवाह ठरविला. पालकांनी इच्छेविरुद्ध लग्न जमविल्याने पळून जाण्याच्या तयारी असलेली मुलगी पेपर देण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडली. पेपर सुरू होण्यापूर्वी तिने प्रियकराला सांगितले की, आज मला घेऊन जा, नाहीतर मी आत्महत्या करेन. त्यानंतर प्रियकर तिला घेऊन सोलापुरातून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोलापुरातील नामांकित महाविद्यालयात त्या मुली शिकत होत्या. पेपर झाल्यानंतरही मुली घरी परत न आल्याने मुलींच्या पालकांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले आणि कोणीतरी मुलींना फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. त्यातील एक मुलगी रेल्वेने हुबळीला गेली होती. पोलिसांनी तिचा तपास घेतला आणि ताब्यात घेऊन बाल कारागृहात सोडले आहे.

हेही नक्‍की वाचा : तुरुंगातील 60 हजार कैद्यांची 'कोरोना' तपासणी


कॉल रेकॉर्डद्वारे पोलिसांचा तपास
अकाउंटचा पेपर देण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली मुलगी पेपर संपल्यानंतरही घरी परतलीच नाही. त्याच्या भीतीने पालकांनी मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी आता त्या मुलीचे कॉल रेकॉर्ड तपासण्यास सुरवात केली असून त्यांचे मोबाइल ट्रॅकिंगला टाकले आहेत. कॉल रेकॉर्डवरून त्या मुलींना कोणी पळवून नेले, याचा शोध घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


हेही नक्‍की वाचा : विद्यापीठांच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या


मुली पळून जाण्याचे वाढतेय प्रमाण
मागील चार-पाच महिन्यांपासून सोलापूर शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार अन्‌ पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. दोन दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा विजापूर नाका पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. आता पुन्हा दोन मुली पळून गेल्याची नोंद सदर बझार पोलिसांत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi: कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; माहिती मिळताच ACB चा सापळा, ठाण्यातील मोठा अधिकारी अटकेत

MRP Protest Delhi: एमआरपीतील त्रुटींविरोधात जंतर-मंतरवर राष्ट्रीय आंदोलन; महाराष्ट्रातून ५०० कार्यकर्ते नवी दिल्लीत रवाना

Latest Marathi News Live Update : ‘काळा पैसा आणि कर आकारणी कायद्या’अंतर्गत अनिल अंबानींविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

SCROLL FOR NEXT