Solapur Accident News
Solapur Accident News sakal
सोलापूर

Solapur Accident News : ऊसतोड महिलेचा अपघाती मृत्यू ; नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील घटना

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : ऊसतोड हंगाम करून घराकडे परतत असताना झालेल्या अपघातातील जखमी झालेल्या सपना परशुराम ऐवळे वय 22 रा.चिक्कलगी या महिलेचा सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान काल रात्री मृत्यू झाला या अपघाताला मृतांची संख्या आता पाच वर पोहोचली आह.

दोन एप्रिल रोजी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील गुरुदत्त साखर कारखान्याचा ऊसतोड हंगाम करून गावाकडे परतत असताना नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आगळगाव फाट्याजवळ रस्त्यालगत ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाल्यामुळे थांबला होता. या ट्रॅक्टरला पाठीमागून भरधाव वेगात ट्रकने दिलेल्या धडकेत हा अपघात झाला.त्यामध्ये शिरनांदगी व चिक्कलगीतील चौघाचा मृत्यू झाला.

यात मृत महिलेच्या तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसानंतर आईचा देखील मृत्यू झाला. तर जखमी एक वर्षाच्या लक्ष्मीवर सध्या उपचार सुरू आहेत त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता पाच वर पोहोचली असून आणखीन नऊ जण उपचार घेत आहेत परिस्थितीशी संघर्ष करत ऊस तोडणी व्यवसायातून उदरनिर्वाह करत असताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील मुलगी व पत्नीच्या मृत्यूने उघड्यावर पडले आहेत.

मयत व जखमी रुग्णांना शासकीय मदतीची घोषणा केली असले तरी हे कुटुंबीय गरीब असल्यामुळे त्यांना खासगी उपचारासाठी आर्थिक अडचणी येत असून परिणामी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय मदत उपचारासाठी कधी मिळणार असा सवाल जखमी रुग्णाच्या नातेवाईकातून विचारला जात आहे साखर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तांनी भेट देऊन विचारपूस केली असली तरी प्रत्यक्षात शासकीय उपाययोजना कधी करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने समोर येऊ लागला आहे.

या अपघातातील अनेक जखमीकडे रेशन कार्ड व आधार कार्डचा अभाव असल्यामुळे उपचारासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.शिवाय खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जखमेवर उपचार होत नसल्याने शासनाने यासाठी पुढाकार घेऊन तातडीने उपचार करणे गरजेचे आहे.

नितीन पाटील,माजी सदस्य पंचायत समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT