Indian Post
Indian Post esakal
सोलापूर

सोलापूर : पोस्टात फास्टटॅगसह ७२ सेवा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : डाक विभागाने आता ग्राहकांसाठी विमा हप्ता, रेल्वे तिकीट, पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी, आयटी रिटर्न्स, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र यासह ७२ प्रकारच्या विविध सेवा डाक विभागाने पोस्टात सुरू केल्या असल्याची माहिती डाक विभागातील सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

डाक विभागांकडून एकाच छताखाली सुविधा मिळणार असल्याने ग्रामीण व शहरातील नागरिकांची सोय झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक पोस्टमध्ये या सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत. डाक विभागात यापूर्वी आधार कार्डसह अपडेशनच्या सुविधा दिल्या जात होत्या. या सुविधांमध्ये विभागाने वाढ केली असून, ती संख्या ७२ वर पोहचली आहे. यात आधारकार्ड सर्व्हिस, डिजिटल सेवा पोर्टल, निवडणूक, लेबर सर्व्हिसेस, पेन्शन, एम्प्लॉयमेंट सेवा, टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स, फॉस्टटॅग, एज्युकेशन सेवा, बॅंकिंग, इन्शुरन्स, मोबाईल बिल पेमेंट,

आयटी रिटर्न, याअंतर्गत विविध सेवा डाक विभागाकडून देण्यात येत आहेत. केंद्र शासनांतर्गत डाक विभागाकडून जिल्हा डाक विभागांना यासंबंधीचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची सोय झाली आहे.

पोस्टात मिळतात या सुविधा

भरतीसाठी अर्ज नोंदणी, महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या सेवा, विमान तिकीट, बस तिकीट, दूरध्वनी बिल, वीज मीटर कनेक्‍शन, पॅन कार्ड, पासपोर्ट, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, सॉइल हेल्थ कार्ड, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, सार्वजनिक वितरण योजना, लायसन्स ॲप्लिकेशन, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना, जीवन प्रमाण, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, मतदार नोंदणी फॉर्म, नाव कमी करण्याचा फॉर्म, बदल किंवा सुधारणा फॉर्म, मतदार तपशिलांमध्ये बदल, लेबर सर्व्हिसेस, कामगार सर्टिफिकेट, कामगार रजिस्ट्रेशन, राष्ट्रीय पेन्शन योजना यासह विविध योजनांचा यामध्ये समावेश आहे.

मुख्य ऑफिस

ग्रामीण भागातील ब्रॅंच

२०५

शहरातील सब ऑफिस

५१

एकूण कर्मचारी

६००

सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी शहरासह ग्रामीण भागात देखीत एकाच छताखाली पोस्ट विभागांमार्फेत सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

- व्यंकटेश रेड्डी, प्रवर अधीक्षक, डाक विभाग, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या अटकेबाबत केजरीवालांच्या बाजूनं निकाल येणार का? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

SCROLL FOR NEXT