तालुक्यात पेरणीपुर्व मशागतीचे कामे सुरु
तालुक्यात पेरणीपुर्व मशागतीचे कामे सुरु sakal
सोलापूर

Solapur : सांगोला तालुका कृषी विभागाची खरिपासाठी संपूर्ण तयारी, अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला - सांगोला तालुक्यामध्ये पेरणीपुर्व मशागतीचे कामे सुरु आहेत. तालूक्याचे सरासरी २२ हजार ७१९ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. सन २०२३ च्या खरिप हंगामामध्ये ४० हजार ३२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. खरिपा हंगामासंदर्भातील पेरणी, बियाणे व खतांचे संपूर्ण नियोजन कृषि विभागाने केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिले आहे.

सध्या उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, फणाटणी कामांबरोबरच शेणखत विस्कटण्याची कामे सुरू आहेत. तालुक्यात सरासरी खरिप क्षेत्र २२ हजार ७१९ हेक्टर आहे. सन २०२१ खरिप मध्ये २९ हजार ८४८ हेक्टर क्षेत्रावर व गतवर्षी सन २०२२ मध्ये ३१ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.

येणाऱ्या २०२३ च्या खरिप हंगामामध्ये ४० हजार ३२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. तालुक्यासाठी यावर्षी खरिपासाठी १५ हजार ८२६ मे. टन रासायनिक खताचे आवंटन मंजुर झाले आहे. या हंगामासाठी येणाऱ्या अडचणी व खतांचे नियोजन कृषि विभागाने केले आहे.

गेल्या वर्षी युरिया खताचा काही प्रमाणात तुटवडा जाणवला होता. यावर्षी खतांचे संपूर्णपणे सूक्ष्म नियोजन केले आहे. गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुका स्तरीय भरारी पथकाची स्थापणा करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्षही स्थापण करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आधिकृत दुकाणदाराकडुनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावेत.

दुकानदाराकडुन पक्के बिल घ्यावे. बॕगवरिल किंमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाणे बॕग व लेबल जपुन ठेवावे. शेतकऱ्यांनी बिजप्रक्रिया करूनच बियाणाची पेरणी करावी. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यवरच म्हणजे ८० - १०० मिमी पाऊस झाल्यवरच पेरणी करावी. बियाणे, खते, किटकनाशके बाबत काही आडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

खतनिहाय मंजुर आवंटन पुढिलप्रमाणे -

खताचे नाव - आवंटण

युरिया - ५,९४७ मे. टन

एस.एस.पी. - २,१४६ मे. टन

एम.ओ.पी. - ९९९ मे. टन

डि.ए.पी. - १,७५७ मे. टन

एन.पि.के. - ४,९७७ मे. टन

खरिप हंगामातील पिकनिहाय पेरणी चित्र -

पिकाचे नाव - सरासरी हेक्टर क्षेत्र - खरीप २०२२ चे क्षेत्र (हे.) - २०२३ चे प्रस्ताविक क्षेत्र (हे) -

बाजरी - १५५९६.६ - ११०१६.४ - १५०००

मका - ३९०१.६ - १४२५६ - १७५००

सुर्यफुल - ३८३.८ - ४०८० - ४२५०

तुर - २५७२.२ - ९८३.१ - १२५०

उडिद - ९४ - ४०३.९ - ६००

मुग - ८५.६ - १९१.८ - ४००

भुईमुग - १५४.८ - ४१२.७ - ५००

सोयाबिन - ०.६ - २३०.८ - ३००

कापुस - ०.२ - २६४.४ - ४००

मटकी - ० - ११२.७ - १२५

एकुण - २२७१९.२ - ३१९५२.८ - ४०३२५.

तालुका कृषी विभागाने यावर्षी खरिपाचे संपूर्ण तयारी केली आहे. यामध्ये औषधे, बियाणे, खते यांचा तुटवडा होऊ नये याची काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांनी आधिकृत दुकानदाराकडुनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावेत. किमतीपेक्षा कोणीही खते औषधांना जास्त पैसे देऊ नये. बियाणे, खते, किटकनाशके बाबत काही आडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT