ncp sharad pawar
ncp sharad pawar  esakal
सोलापूर

Solapur : पवारांच्या मंगळवेढा दौऱ्यात राष्ट्रवादीला बूस्टर डोस देणार का ?

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आढावा गत आठवड्यात अध्यक्ष खा.शरद पवारांनी सांगोल्याचे दीपक साळुंखेकडून घेतला.पंढरपूर विधानसभेची जागा गमावलेल्या मतदारसंघातील आजच्या मंगळवेढ्याच्या दौऱ्यात पक्ष बांधणीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांना काय डोस देतात का ? याची चर्चा सुरू झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र ओबीसी विभागाचे लतीफ तांबोळी यांच्या मुलीच्या विवाह निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मरवडे(मंगळवेढा) दौऱ्यावर आज येत आहेत. यापूर्वी ते 2013 च्या दुष्काळ पाहणीच्या निमित्ताने तालुक्यातील लेंडवेचिंचाळे येवून फळबागाचे अनुदानाचा निर्णय घेतला.

तब्बल नऊ वर्षानंतर ते मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर मतदारसंघात पक्ष बांधणीच्या दृष्टीने जिल्ह्यातील नेत्यांनी म्हणावे येथे लक्ष दिले नाही शिवाय महाविकास आघाडी सरकार असताना स्व. आ भालकेच्या पश्चात पालकत्व घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील दुर्लक्ष केले आहे

अशा परिस्थितीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चिंतन बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मंगळवेढ्याकडे पाठ फिरवली त्यामुळे आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने पक्षाची तयारी सध्या दृष्टीने चिंताजनक आहे.कारण राज्यातील सत्ता बदलल्यानंतर भाजपाने वेगवेगळ्या माध्यमातून निधी देण्यास सुरुवात केली शिवाय पक्ष बांधणी देखील त्याच पद्धतीने सुरू केली.

भाजपच्याच एका गटाने त्यांच्या कारखाना निवडणुकीत विरोधी काम केले.संभाव्य धोका ओळखून आता पासून सावध पावले टाकत निधी व कामाचा सपाटा जोरात लावला. त्यातून पक्ष बांधणी होऊ लागली. मात्र गेलेली जागा पुन्हा पटकावण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून मात्र म्हणावे तितके प्रयत्न होताना दिसत नाहीत.

मतदार संघाचे पालकत्व घेतलेले आ.रोहित पवार देखील या मतदारसंघात फिरकलेच नाहीत.एके काळी पवार बोले मंगळवेढा हाले अशी परिस्थिती असतानाच या मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागत आहे.त्यामुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न सध्या दुर्लक्षित राहू लागले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी करण्याची आवश्यकता आहे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील कारखान्यावरील सत्ता स्थापनेनंतर त्यांचा राजकीय विस्तार वाढवतील अशी शक्यता होती मात्र कारखान्यावरील सत्तेनंतर कारखाना एक्के कारखाना असे काम सुरू ठेवले,तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके व त्यांच्या पत्नी डाॅ प्रणिता भालके हे मतदाराशी वाढदिवस व सात्वनातून सातत्याने संपर्क ठेवला आहे मात्र मतदारसंघातील पीकविमा,मंगळवेढा उपसा सिंचन

योजना,भोसे प्रादेशिक,बसवेश्‍वर स्मारक प्रश्न सोडवण्यासाठी जनआंदोलन उभारले नाही. त्यामुळे आगामी काळात पक्ष बांधणीच्या दृष्टीने आजच्या दौऱ्यातून काय संदेश देतात याकडे लक्ष लागले.

2009 च्या पराभवानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांना ताकद न देता खच्चीकरण केल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सी.पी. बागलांना संधी दिली.अतिशय नगण्य मते पडली त्यानंतर त्यांनीही पक्षापासून अंतर घेतले.2019 ला स्व. भारत भालके यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला.

राष्ट्रवादीने जागा पदरात पडली.मात्र त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षांच्या पराभवानंतर देखील भालकेना ताकद न देता अभिजीत पाटलाच्या रूपाने पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.वारंवार वेगळे पर्याय शोधण्यामुळे स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पंढरपुरातील भाजप नेत्याशी जवळीक साधण्याचा पर्याय निवडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT