Electric-Vehicle 
सोलापूर

सोलापूरकरामध्ये इलेक्‍ट्रिक वाहनांची क्रेझ

चारचाकी अन्‌ दुचाकीना मोठी मागणी

विजय थोरात

राज्य शासनाने इलेक्‍ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी इलेक्‍ट्रिक वाहन धोरण जाहीर केले.

सोलापूर: दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणावर चांगला उपाय म्हणून नागरिकांचा पेट्रोलवरील दुचाकी व चारचाकीऐवजी बॅटरीवर चालणारी इलेक्‍ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शहरात 5 चारचाकी, 660 दुचाकी आणि 10 ई-रिक्षा रस्त्यावर धावू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य शासनाने इलेक्‍ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी इलेक्‍ट्रिक वाहन धोरण जाहीर केले. उत्पादकांना सवलती व वाहन खरेदी करताना सवलत जाहीर केली. यात दहा टक्के वाहने ही इंधनाशिवाय बॅटरीवर चालणारी उत्पादित करणे, चार्जिंगसाठी विविध ठिकाणी चार्जिंग केंद्र स्थापन करणे. वाहनांचे रिसायकलिंग मटेरियल मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी गोष्टी प्रशासन करणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला नागरिक खूप वैतागले असून, इलेक्‍ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करण्यास पसंती देत आहेत.

सोलापूरकरांनी इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचे दिसून येत आहे. वाहन खरेदीच्या आकडेवारीवरून त्यास दुजोरा मिळाला आहे. आजमितीला शहर आणि परिसरात 660 इलेक्‍ट्रिक दुचाकी, 5 इलेक्‍ट्रिक चारचाकी तर 10 ई-रिक्षा धावत आहेत. वाहन खरेदी करताना सरकारने सवलत जाहीर केली आहे. वापरानंतर त्या मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे देखील जाहीर केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलशिवाय धावणाऱ्या या इलेक्‍ट्रिक दुचाकी, चारचाकी वाहनांचा यामध्ये समावेश असणार आहे.

ठळक बाबी

- वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण येणार

- निसर्गाची हानी कमी होणार

- पेट्रोल आणि डिझेलवर होणार खर्च कमी होणार

- भविष्यात इलेक्‍ट्रिक वाहनांची संख्या आणखी वाढणार

आकडे बोलतात

- इलेक्‍ट्रिक मोटारसायकल- 660

- इलेक्‍ट्रिक चारचाकी - 5

- ई- रिक्षा- 10

राज्य शासनाने इलेक्‍ट्रिक वाहनांविषयी धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे सोलापूर शहरात इलेक्‍ट्रॉनिक वाहने खरेदी करण्याकडे सोलापूरकरांची पसंती वाढत आहे. येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT