सोलापूर 'झेडपी'ची सोमवारची सर्वसाधारण सभा ऑनलाइन?

सोलापूर 'झेडपी'ची सोमवारची सर्वसाधारण सभा ऑनलाइन?
Updated on: 
Summary

या सभेला महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अद्यापही परवानगी न दिल्याने "झेडपी'ची ही सभा ऑनलाइनच होणार असल्याचे आता जवळपास निश्‍चित झाले आहे.

सोलापूर: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन नको ऑफलाइनच घ्या अशी जोरदार मागणी करत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या या मागणीला "खो' बसण्याची शक्‍यता आहे. सोमवारी (ता.26) दुपारी दोन वाजता सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. या सभेला महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अद्यापही परवानगी न दिल्याने "झेडपी'ची ही सभा ऑनलाइनच होणार असल्याचे आता जवळपास निश्‍चित झाले आहे.

सोलापूर 'झेडपी'ची सोमवारची सर्वसाधारण सभा ऑनलाइन?
सोलापूर जिल्ह्याचा दहावी निकाल 99.27 टक्के

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभा ऑनलाइन पध्दतीने घ्याव्यात अशा सूचना नगरविकास व ग्रामविकास विभागाने काढल्या आहेत. त्यानुसार महापालिकेची सर्वसाधारण सभाही ऑनलाइन पध्दतीने झाली. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मात्र ऑफलाइन पध्दतीने घ्यावी, यासाठी काही सदस्य आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषदेतील अधिकारी त्यांचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी व त्यांच्या कारभारावर होणारी चर्चा टाळण्यासाठी ऑनलाइन सभेचा घाट घालत असल्याचा आरोप सदस्य करु लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेला परवानगीच मिळणार नाही हे जवळपास आता निश्‍चित झाल्याने सोमवारी (ता.26) जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सदस्य आक्रमक होण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर 'झेडपी'ची सोमवारची सर्वसाधारण सभा ऑनलाइन?
रेल्वे विद्युतीकरणाचा "फास्ट ट्रॅक'! सोलापूर विभागाचे काम अंतिम टप्प्यात

जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा ऑफलाइन पध्दतीने घेण्याचा आमचा विचार होता. परंतु याठिकाणी सभा घेता येणार नसल्याचे आता समोर येऊ लागले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सोमवारची सर्वसाधारण सभा ही ऑनलाइन पध्दतीने होणार आहे.

- अनिरुध्द कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष

ऑफलाइन सभा घेण्यास आमची काहीच हरकत नाही. राज्यातील सर्वच जिल्ह्यात ऑनलाइन सभा होतात. मी सातशे जणांच्या उपस्थितीत ऑनलाइन मिटिंग घेतो. डॉ. फडकुले सभागृहात सभा घेण्यास परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाली तरच ऑफलाइन सभा होईल. जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकृतपणे सभा घेण्यास अडचणी आहेत. त्याठिकाणी सभा झाल्यास ती बेकायदेशीर असेल, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता आहे. - दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी

सोलापूर 'झेडपी'ची सोमवारची सर्वसाधारण सभा ऑनलाइन?
परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! सोलापूर विद्यापीठ

सर्वसाधारण सभाही ऑफलाइन पध्दतीने व्हावी यासाठी आम्ही नियोजन केले आहे. त्यासाठी डॉ. फडकुले सभागृहात सभा घेण्यास परवानगी मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे. अद्यापर्यंत आम्हाला परवानगी मिळालेली नाही. "झेडपी'ची सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाइन की ऑफलाइन हे रविवारी निश्‍चित होईल.

- परमेश्‍वर राऊत, सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com