esakal | परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडे द्यावा लागणार अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! सोलापूर विद्यापीठ

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या समन्वय समितीने हा निर्णय घेतला आहे.

परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! सोलापूर विद्यापीठ

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तांत्रिक अडचण व आरोग्यविषयक समस्यांमुळे परीक्षा (Exam) देता न आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लगेच परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur university) समन्वय समितीने हा निर्णय घेतला आहे. परंतु, अडचण आल्यानंतर पुढील दहा दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमार्फत विद्यापीठाकडे अर्ज करावा लागणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Unlock..तरच राज्यातील निर्बंध शिथील, प्रशासनाचा इशारा

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या ऑनलाइन सुरू आहे. दररोज तीन सत्रात जिल्हाभरातील अंदाजित 25 ते 26 हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. ऑनलाइन परीक्षेमुळे निकालास विलंब होत नाही. विद्यार्थी पुढील प्रवेश अथवा नोकरीसाठी अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेत विद्यापीठाने परीक्षेनंतर काही दिवसांतच निकाल जाहीर करण्याचेही नियोजन केले आहे. तत्पुर्वी, लॉ आणि बी-एड्‌ची परीक्षा पार पडली असून त्याचा निकाल सोमवारी (ता.19) जाहीर केला जाणार आहे. सध्या 98 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा सुरळीत सुरु आहे. प्रॉक्‍टिरिंग प्रणालीमुळे (विद्यार्थ्यांच्या हालचाली व लोकशेनवर वॉच) परीक्षेत पारदर्शकता आल्याचेही विद्यापीठाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: सोलापूर विद्यापीठ नामविस्तारासाठी 523 निवेदने

दरम्यान, परीक्षेची लिंक ओपन झाली नाही अथवा मधूनच नेटवर्क गेले, गाडीचा अपघात झाला, अचानक आजारी पडला, अशा कारणांमुळे परीक्षा देता न आलेल्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. त्यांनी महाविद्यालयांमार्फत केलेल्या अर्जावर कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरु डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे व परीक्षा नियंत्रक डॉ. विकास कदम यांची समन्वय समिती निर्णय घेणार आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्याचा दहावी निकाल 99.27 टक्के

तांत्रिक कारणास्तव परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्याने दहा दिवसांत महाविद्यालयामार्फत अर्ज करणे बंधनकारक आहे. कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांची समन्वय समितीकडून त्या अर्जावर निर्णय होईल.

- डॉ. विकास कदम, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

हेही वाचा: सोलापूर चारनंतर 'लॉक'! जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद?

अभियांत्रिकीची 17 ऑगस्टपासून परीक्षा

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. 20 आणि 21 जुलैला परीक्षेसाठी सुट्टी देण्यात आली आहे. त्या दिवशी तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता न आलेल्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाकडून सुरु आहे. दुसरीकडे "एआयसीटी'च्या निर्देशानुसार अभियांत्रिकीतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची दुसरी सेमिस्टर परीक्षा 17 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. कोरोना काळात विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेत बाजी मारली असून राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ एक पाऊल पुढे राहिले आहे.

loading image