theft of gold jewelery from woman passenger purse while boarding bus solapur
theft of gold jewelery from woman passenger purse while boarding bus solapur Sakal
सोलापूर

Solapur Crime : बसमध्ये चढताना प्रवाशी महिलेच्या पर्समधील सोन्याच्या दागिन्याची चोरी; टेंभुर्णी बसस्थानकावरील घटना

संतोष पाटील

टेंभुर्णी : टेंभुर्णी येथील बसस्थानकावर एस टी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशी महिलेच्या पर्समधील सुमारे तीन लाख रूपये किंमतीचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एका महिलेने चोरून नेले. सोमवारी दुपारी साडे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

वर्षा रविद्र गायकवाड (वय 50 वर्षे, धंदा- नोकरी रा. सेनापती बापट चौक जवळ मारने गॅरेज दापोडी पुणे 12 ता. हावेली जि.पुणे) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यामध्ये पंचेवीस ग्रॅम वजनाचे दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र ,

पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स असे एकूण अंदाजे तीन लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड ची चोरी झाल्याचे नमूद केले आहे.

याविषयी पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, फिर्यादीची बहीण स्मिता गायकवाड (रा.महादेव गल्ली टेंभुर्णी ता.माढा) यांच्याकडे सोमवारी वास्तुशांती कार्यक्रम असल्याने रविवारी त्या सहकुटुंब टेंभुर्णीत आल्या होत्या.

दुपारी चार वाजता वास्तूशांती कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांनी जवळचे सोन्याचे दागिने पर्समधील पाऊचमध्ये ठेवले व सव्वा चार वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णीतील एस टी बसस्थानकावर पोहचल्या. साधारण अर्धातास थांबल्यानंतर किल्लेधारुर ते पुणे जाणारी बस आली. या बसमध्ये चढण्यासाठी लोकांची गर्दी झालेली होती.

यावेळी बसमध्ये चढत असताना त्यांना कोणीतरी पर्सला ओढल्यासारखे वाटले. परंतू लोकांच्या गर्दीचा पर्सला धक्का लागला असेल असे वाटल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष करून बसमध्ये चढून आत जाऊन सीटवर बसल्या.

यानंतर पर्स तपासली असता त्यांना पर्सची चेन उघडलेली दिसली व पर्समधील सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याचे दिसले .त्यानंतर त्यांनी पती रविंद्र यांना घडला प्रकार सांगितला व बसमधून सर्वजण खाली उतरले.

सर्वांनी चोरी झालेल्या दागिन्यांचा व संशयित चोराचा शोध घेतला परंतु काही चोरीस गेलेला ऐवज मिळुन आला नाही. त्यानंतर टेंभुर्णी बसस्थानक नियंत्रण कक्षामध्ये जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक गुलाबी रंगाचा कुर्ता व पांढरी रंगाचा सलवार व तोंडास पांढ-या रंगाची ओडणी बांधलेली व तीच्या खांद्याला विटकरी रंगाची पर्स असलेली महिला वर्षा गायकवाड यांच्या पाठीमागे येवुन पर्समधील सोन्याचे दागिने असलेल्या पाकीट चोरी करताना दिसली.

यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात येऊन संशयित महिलेच्या विरोधात वर्षा गायकवाड यांनी चोरीची फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार विलास रणदिवे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT