Wari Parivarachi Team
Wari Parivarachi Team Sakal
सोलापूर

Cycle Campaign : 'वारी परिवाराची' सायकलस्वारांनी 305 कि.मी. अंतर सायकलवर पार करून रायगड केला सर

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - रायगड संवर्धन व पर्यटन विकास जनजागृतीसाठी मंगळवेढा ते रायगड ऐतिहासिक सायकल मोहिमेसाठी वारी परिवाराचे सायकलस्वारांनी 305 किलोमीटरचे अंतर सायकलवर पार करून रायगड सर केला.

मंगळवेढ्याच्या शिवालयातील शिवमुर्तीचे पूजन करून चार दिवसाच्या ऐतिहासिक सायकल मोहीमेत पंढरपूर-वेळापूर-माळशिरस- नातेपूते-फलटण-शिरवळ-भोर-वरंध-महाड-पाचाड-रायगड या मार्गावर गडकोट स्वच्छता व संवर्धन विषयी जनजागृतीपर पत्रके वाटण्यात आली. पाचाड याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी पूजन करून दिपोत्सव साजरा केला.

आज सकाळी सहा वाजता रायगडाच्या पायथ्यापासून पायी चालत 29 जणांनी गड सर केला. जगदीश्वर मंदीर, बाजापेठा, छत्रपती शिवरायांची समाधी, राजवाडा, वाडे, महादरवाजा, शिरकाई मंदीर, राजदरबार, अष्टप्रधान वाडे व सप्त मंजिली बुरुज आदि ठिकाणांना भेटी देऊन आलेल्या पर्यटक तरूणांना वैभवशाली इतिहासाची ओळख करून दिली.

शिवाय यातील काही तरुणांनी स्वच्छता अभियान देखील राबवले तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देखील होळीच्या माळावर दिमाखात उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास साकडे घातले.

दरम्यान महाड दौऱ्यावर आलेले मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी या ऐतिहासिक सायकल मोहीमेत सुहास ताड, चंद्रकांत शहा, दत्तात्रय आसबे, सिद्धेश्वर डोंगरे, पवन टेकाळे, समर्थ महामूनी, रोहन सुर्यवंशी, भारत नागणे गणे, स्वराज कलुबर्मे, सौरभ मुढे, हर्षद वस्त्रे, संजय जावळे, रोहित वाघ, पांडूरंग कोंडूभैरी, प्रा विनायक कलुबर्मे या सायकल स्वराचे कौतुक केले. उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

सध्याच्या धावपळीच्या काळात प्राप्त परिस्थितीला सामोरे जाताना शरीर टिकवण्यासाठी सायकल रॅलीतून मिळणारा आनंद वेगळा आहे. ऐतिहासिक किल्ल्याला दिलेल्या भेटीतील शिवविचार तरुणांनी रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत. वरंधा घाटातील सायकलवरील प्रवास अनुभव देणारा ठरला आहे

- प्रा. विनायक कलुबर्मे, सायकलस्वार, मंगळवेढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT