सतीश जगताप
सतीश जगताप Sakal
सोलापूर

शेतकऱ्यांच्या अडचणीचा निपटारा करणार : उपाध्यक्ष जगताप

राजकुमार शहा

मोहोळ - टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात, कार्यक्षेत्रातील पुळुज येथील शेतकऱ्यांनी सर्वात जास्त 31 हजार मेट्रिक टन उसाचा पुरवठा करून उच्चांक नोंदविला, तर अन्य पाटकुल, मगरवाडी, अंकोली, पेनुर या गावांनीही मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष व शेतकऱ्यांचा या पार्श्वभूमीवर लवकरच सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी दिली.

चालू गळीत हंगामात कारखान्याने अनेक संकटाच्या मालिकेवर मात करीत ऊस गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला. चालू हंगामात कारखान्याने 157 दिवसात चार लाख 81 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पैसे मिळतील की नाही या भीतीपोटी कारखान्यास उसाच्या नोंदी दिल्या नव्हत्या. मात्र कारखान्याकडे उसाची मोठी आवक सुरू झाल्याचे त्या शेतकऱ्यांच्या निदर्शसनास आल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून कारखान्याने त्यांचाही ऊस गाळपास नेला. संचालक मंडळ तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

भीमा कारखान्याला अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम भेडसावत होता.कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी विस्तारीकरण करून तोही प्रश्न मार्गी लावला. कार्यक्षेत्रातील सर्वच गावांनी कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे त्यात शंका नाही. पेनुर, पाटकुल, मगरवाडी, अंकोली या गावानी ज्यादा ऊस पुरवठा केला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. भीमराव (दादा) महाडिक यांनी दूरदृष्टी ठेवूनच कारखान्याची निर्मिती केली, त्यामुळे शेतकरी व कारखाना यांचे नाते घट्ट होण्यास मदत झाली.भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींचा निपटारा करून त्यांना दिलासा देणार असल्याचे उपाध्यक्ष जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT