Mobile-App
Mobile-App 
पश्चिम महाराष्ट्र

यंदा ‘कलचाचणी’ मोबाईल ॲपद्वारे

सकाळवृत्तसेवा

सातारा - राज्यातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे करिअर निवडण्यासाठी तसेच त्यांच्यामधील अभिरुची आणि अभिक्षमता समजावी यासाठी राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांतून घेण्यात येणारी ‘कलचाचणी’ हा उपक्रम यंदा महाकरिअर मोबाईल ॲपद्वारे घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड झाली आहे. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (विद्या प्राधिकरण) व श्‍यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने दरवर्षी इयत्ता दहावीसाठी कलमापन चाचणी आयोजित केली जाते. यंदा ही कलमापन चाचणी महाकरिअर मोबाईल ॲपव्दारे घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यानुसार आजपासून जिल्ह्यातील ११ तालुक्‍यांतील सर्व शाळांतील दहावीचा वर्ग शिकविणाऱ्या एका तंत्रस्नेही शिक्षकास तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यास प्रारंभ झाला आहे. 

मोबाईल ॲपच्या माध्यमाव्दारे ही चाचणी १५ ते २० ऑक्‍टोबर कालावधीत सातारा जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात कलचाचणी उपक्रमामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाले. श्‍यामची आई फाउंडेशनचे सुशांत खड्ड, प्रणव पेंडसे आणि श्री. दांडेकर यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. या वेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव टी. एन. मोळे हे उपस्थित होते. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी कलमापन चाचणी ही सर्व शाळांतून मोबाईल ॲपद्वारे घेण्यात येणार असल्याने संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा किंवा जबाबदार कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक, तसेच शाळेचा युडायस क्रमांक याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यभरात सर्व जिल्ह्यात डिसेंबर-जानेवारी महिन्यात अशी चाचणी घेण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे. दरम्यान, ही चाचणी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्याची सुविधा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT