story of Shakhutai who made 500 kg diwali sweets
story of Shakhutai who made 500 kg diwali sweets 
पश्चिम महाराष्ट्र

Diwali Festival : कोल्हापुरातील चकलीमास्टर शकुताईंनी दिली बचतगटांनाही चालना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दिवाळीच्या फराळात खुसखुशीत तितक्याच चटकदार चकलीला खूप महत्त्व आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीत राहणाऱ्या शकू ताई औंधकर दरवर्षी 500 किलो चकली बनवतात. येथील स्वयंसिद्धा संस्थेला त्या चकली पुरवतात. चकलीच्या या उद्योगातून त्या स्वतः स्वावलंबी झाल्याच शिवाय आणखी चार महिलांना ही त्यांनी स्वावलंबी केले आहे.

दिवाळी म्हणजे तसं प्रकाश, आकाश कंदील, फटाके याप्रमाणे लज्जतदार फराळ. तोंडात ठेवताच विरघळणारे लाडू, करंज्या, अनारसे, चकली, शेव, बाकरवडी, चिवडा या खमंग फराळाचा दरवळ घराघरात सुटतो. आता दिवाळीला अवघी चार दिवस राहिल्याने प्रत्येकाच्या घरात फराळाचे एकेक पदार्थ बनू लागले आहेत मात्र फराळाचे हे कसब सगळ्यांना जमते असे नाही. त्यासाठी गृहिणींचे चार-पाच दिवस घरातच जातात.



किराणा मालापासून ते पदार्थ बनविण्यात पर्यंतची ही सगळी प्रक्रिया जितकी वेळखाऊ तितकीच सुगरणीचे कसब पणाला लावणारी आहे. तेलाचे मोहन घालण्यापासून साखर मैदा चे प्रमाण नेमके हवे एका साहित्याचे माप चुकले की पदार्थ फसलात म्हणून समजा. त्या पैकी एक म्हणजे चकली. ही चकली बनवण्यासाठी सुगरणीचे कसब पणाला लागते. शहरात अनेक महिला घराबाहेर पडून नोकरी व्यवसाय करतात. त्यांना हे पदार्थ बनविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. या सगळ्याला पर्याय म्हणून महिला संस्था व बचत गट तयार फराळ तयार करतात. तयार फराळाचे एकेक पदार्थ बचत गटातील एकेक महिलेला देतात.

ती महिला त्या पदार्थाची जितकी मागणी असेल तितका प्रमाणात तो पदार्थ बनवते. अशाच चकली बनवणाऱ्या शकू ताई कोल्हापुरात चकलीच्या मास्टर म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे शकू ज किचन लाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT