Sudha Korajkar Drive Tractor Do Farm Work Alone
Sudha Korajkar Drive Tractor Do Farm Work Alone  
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : ट्रॅक्‍टर चालविण्यात तरबेज ‘सुधा’

अमृत वेताळ

बेळगाव - कधी काळी चूल-मूल सांभाळणाऱ्या स्त्रीला शिक्षण मिळालं आणि तिच्या कर्तृत्वाला गगन ठेंगणे झाले. दुय्यम पद्धतीची कामे ही महिलांनीच करायची, असा अलिखित नियमच होता; पण हळूहळू काळ बदलला. ग्रामीण भागात शेतीची दुय्यम कामं ही महिलांच्याच वाट्याला येतात, पण आता काळ बदललाय. सैराट चित्रपटात आर्ची ट्रॅक्‍टर चालविताना साऱ्यांनीच पाहिली, मात्र सावगावमधील सुधा बाळू कोरजकर यांच्या ट्रॅक्‍टरची गोष्ट मात्र भन्नाटच आहे. शेतीकामासाठी सुधा यांनी आता ट्रॅक्‍टरचे स्टेअरिंग हातात घेऊन शेताच्या कामाची सगळी जबाबदारी स्वत:वर पेलली आहे.

प्रगतिशील शेतकरी बाळू कोरजकर यांची दोन ट्रॅक्‍टर आहेत. दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे त्यांनी पत्नी सुधा यांनाच ट्रॅक्‍टर चालवायला शिकवले आहे. आता त्याच ट्रॅक्‍टरने शेतीची कामे करत आहेत. २००४ मध्ये बाळू आणि सुधा यांचा विवाह झाला. कोरजकर यांची बारा एकर शेती असून त्यांची कारही आहे. दोन वर्षांपूर्वी सुधा यांना त्यांनी कार चालवायला शिकविले, वाहन चालविण्याची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी ट्रॅक्‍टरचे स्टेअरिंगही हाती घेतले. त्या ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने भाताची मळणी काढतात. मळणी काढताना त्यांनी रिव्हर्स गिअरमध्ये ट्रॅक्‍टर सहजपणे चालवून त्यांनी कौशल्य सिद्ध केले आहे.

शेती कामे वेळेत व्हावीत यासाठी शिकवला ट्रॅक्टर

याबाबत त्यांचे पती बाळू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील वैजू राक्षे यांच्या सुधा यांच्या मुलीबरोबर माझा विवाह झाला. त्यांना पूर्वीपासूनच शेतीची आवड होती. शेतीची कोणतीही कामे माझ्यामुळे राहू नये म्हणून मी सुधाला ट्रॅक्‍टर चालवायला शिकविले. माझ्या मुलांनाही मी हे सर्व शिकविणार असल्याचेही त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  

ट्रॅक्‍टरद्वारे शेतातील कामे स्वतः करते

वडिलांमुळे शेती कामाची आवड होतीच. विवाहानंतर पती बाळू यांनी ट्रॅक्‍टर चालविण्यास शिकविले. त्यामुळे पती घरी नसताना ट्रॅक्‍टरद्वारे शेतातील सर्व कामे जमतील तशी करते. काम करताना काही चुकले तर पती समजावून सांगतात. 
-सुधा कोरजकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT