0corona_498.jpg
0corona_498.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तीन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला! मंगळवेढ्यात कोरोनाची एन्ट्री; शनिवारी 'ग्रामीण'मध्ये 43 पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ग्रामीणमध्ये आज (शनिवारी) 43 रुग्णांची भर पडली असून आता एकूण रुग्णसंख्या 520 झाली आहे. दरम्यान, मागील चार महिन्यांपासून कोरोनापासून चार हात लांब असलेल्या मंगळवेढा तालुक्‍यात कोरोनाची एन्ट्री झाली आहे. पाटकळ या गावात एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. 

सुमित्रा नगर-यशवंत नगर येथे एक (ता. माळशिस), मार्डीत दोन (उत्तर सोलापूर), सबजेल तहसिल ऑफिस येथे दोन, नाईकवाडी प्लॉट, उपळाई रोड येथे एक, भवानी पेठ येथे दोन, पाटील प्लॉट येथे एक, नागोबाची वाडी येथे पाच, वैराग, साकत पिंपरी, उक्‍कडगाव (ता. बार्शी) येथे प्रत्येकी एक, बक्षीहिप्परगा, वडापूर, घोडा तांडा, मंद्रूप येथे प्रत्येकी एक तर नवीन विडी घरकूल येथे दोन (ता. दक्षिण सोलापूर) रुग्ण सापडले आहेत. तसेच अक्‍कलकोट तालुक्‍यातील विजय नगरात दोन, बुधवार पेठ, माणिक पेठ, संजय नगर, भिम नगर येथे प्रत्येकी एक, समर्थ नगरात तीन, करजगी येथे एक, जेऊरवाडी येथे दोन, बोरगाव दे. येथे एक रुग्ण सापडला आहे. पंढरपुरातील लिंकरोड येथे दोन, येळे वस्ती येथे एक, करकंब येथे एक रुग्ण सापडला आहे. मोहोळमधील क्रांती नगरात एक तर पाटकळ (ता. मंगळवेढा) एक तर सांगोल्यातील वाकी शिवणे येथे एक रुग्ण सापडला आहे.

शहरातील प्रलंबित 369 रिपोर्टची लागली चिंता 
सोलापूर ग्रामीणमधील एकूण 191 जणांचे रिपोर्ट शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सापडले असून 148 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तिघांनी कोरोनावर मात करीत आज घर गाठले. ग्रामीणमधील रुग्णांची संख्या आता 520 झाली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने समाधान व्यक्‍त होत आहे. आता शहरातील रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले असून शुक्रवारी (ता. 3) शहरातील 369 अहवाल प्रलंबित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT